भोजापूर येथून ३९ वर्षीय मतिमंद मुलगी बेपत्ता.

0
21

 पोलीसात तक्रारदाखलः शोधमोहीम सुरू.

देवरी, ता.०२: देवरीच्या एकात्मिक आदिवासी विकास महामंडळात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याची मतिमंद असलेली ३९ वर्षीय मुलगी भंडारा येथून बेपत्ता झाल्याची घटना गेल्या २५ मार्च रोजी घडली. सदर प्रकरणासंबंधी भंडारा पोलिसात तक्रार दाखल करून बेपत्ता मुलीची शोघमोहीम सुरू आहे.

सविस्तर असे की, देवरी येथील रहिवासी आणि आदिवासी विकास महामंडळात कार्यरत झामु परतेती यांचा मुलगा कन्हैयालाल परतेती हा आपल्या कुटुंबासोबत भंडारा पोलिस स्टेशन हद्दीतील भोजापूर येथे राहतो. श्री परतेती यांना एक ३९ वर्षाच्या मतिमंद असलेली सोनी उर्फ रंजिता नावाची मुलगी आहेय ही मुलगी मुलगा कन्हैया कडे राहत होती. ती गेल्या २५ मार्च पासून घरातून अचानक बेपत्ता झाली आहे.

 बेपत्ता झालेल्या या मुलीचे वर्णन रंग सावळा, उंची ५ फूट २ इंच, केस काळे, अंगात हिरव्या रंगाची गाऊन घातलेली आणि हातात कपड्याचा थैला व फक्त सोनी आसलपानी असे बोलणारी अशा वर्णाची मतिमंद मुलगी ही घरून बेपत्ता झाली आहे. या मुलीच्या पत्ता किंवा शोध लागल्यास भंडारा पोलीस स्टेशन अथवा झामुजी परतेती देवरी मोबाईल क्रं. ०९०४९३६१९८१ यावर संपर्क करावे असे आवाहन करण्यात आले आहे.