आयपीएल सट्टय़ावर धाड; दोघांना अटक; ७.११ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
17

गडचिरोली-आयपीएल क्रिकेटवर ऑनलाईन जुगार खेळत असल्याच्या माहितीवरून देसाईगंज पोलिसांनी धाड टाकून घटनास्थळावरून ७ लाख ११ हजार ६३0 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कमलेश मुरलीधर कुमरे, (२८) रा. शिवाजी वार्ड देसाईगंज, अक्षय रमेश मेर्शाम, (२७) रा. गांधी वार्ड देसाईगंज या ऑनलाईन सट्टा चालविणार्‍या आरोपींना अटक करण्यात आली. तर दोनजण फरार होण्यास यशस्वी झाले. सदर कारवाई १0 मे रोजी करण्यात आली.
सद्या देशात आयपीएलचा सीजन सुरु असून आयपीएलवर सुरु असलेल्या अवैध सट्टाबाजीवर आळा घालून कठोर कारवाई करण्याचे निर्देश संपूर्ण जिल्ह्यातील पोस्टे / उपपोस्टे व पोमके यांना पोलिस अधीक्षकांनी दिले होते. त्या पार्श्‍वभुमीवर १0 मे रोजी देसाईगंज येथे आयपीएलवर मोठय़ा प्रमाणात ऑनलाईन सट्टा सुरू असल्याची माहिती मिळली. यावरून पोलिसांनी कुथे पाटील हायस्कुल देसाईगंज समोर जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी काही ईसम चेन्नई विरुद्ध दिल्ली या आयपीएल क्रिकेट सामन्यावरती अवैध वेबसाईटच्या माध्यमातून सट्टा (जुगार /बेटींग) खेळत असल्याचे मिळून आले. तेंव्हा त्यातील एकास ताब्यात घेऊन विचारपूस करुन मोक्यावर झडती घेतली असता त्याने सांगितले की, सदर वेबसाईटची लिंक, युजर आयडी आणि पासवर्ड इत्यादी अक्षय रमेश मेर्शाम रा. गांधी वार्ड देसाईगंज या व्यक्तीने दिली असुन त्या वेबसाईटच्या माध्यमातून मी अवैध सट्टा लावत असल्याचे सांगितले. तसेच अक्षय मेर्शाम हा शहरातील अनेक तरुणांना आयपीएलवर सट्टा (जुगार / बेटींग) लावण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड तयार करून देऊन सट्टाबाजी करण्यास उत्तेजित करीत असल्याचे सांगितल्याने.
त्यानंतर पोलिसांनी शहरात त्याचा शोध घेऊन पाठलाग केले असता लांखादूर टि-पाईंट जवळ रोडच्या बाजूला एक जुनी वापरती पांढर्‍या रंगाची हयुडाई क्रेटा वाहन क्र. एमएच ४0 एआर ९३६३ अंदाजे किंमत ६,५0,000/- रुपयाच्या वाहनामध्ये आत बसुन अवैधरित्या आयपीएलवर सट्टाबाजी करीत असताना आढळून आला. पोलिसांनी सदर वाहनाची झडती घेतली असता जुन्या वापरत्या अँपल, सॅमसंग, रेडमी कंपनीचे मोबाईल फोन, विविध बँकेचे एटीएम कार्ड, काही पर्सनल कागदपत्र, आकडेवारीचे चिठ्ठी व काही रोख रक्कम असा अंदाजे एकुण ७ लाख ११ हजार ६२0 रुपयांचा मुद्देमाल कारवाई करुन जप्त केलेला आहे.
याप्रकरणी देसाईगंज पोलिस ठाण्यात येथे अपराध क्रमांक 0१५५/२0२३ कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ व कलम १0९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आली.