भाजपच्या दोन माजी जिल्हाध्यक्षांचा बीआरएसमध्ये प्रवेश

0
28

भंडारा-तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षात भंडारा भारतीय जनता पक्षाच्या दोन माजी जिल्हाध्यक्षांसह अनेकांनी प्रवेश केला आहे.
डॉ. प्रकाश महालगावे, धनंजय मोहोकर, अरविंद भालाधरे, अरूण भेदे या भंडारा येथील पदाधिकार्‍यांसह गोंदिया जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांचा यामध्ये समावेश आहे. डॉ.प्रकाश महालगावे हे राष्ट्रीय मच्छीमार आघाडी भाजपचे माजी अध्यक्ष आणि भंडारा जिल्हा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. जनसंघपासून आतापर्यंत भंडारा-गोंदिया जिल्ह्यात भाजप रुजविणारे कर्मठ कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. धनंजय मोहोकर हे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. अरविंद भालाधरे हे २0१९ च्या विधानसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार होते. तसेच ते भंडारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती राहिले आहेत. अरुण भेदे हे भंडारा नगर परिषदेचे भाजपचे माजी नगरसेवक आहेत. या सर्वांनी तुमसर विधानसभेचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली भारत राष्ट्र समितीत बुधवारी प्रवेश केला.