कार अपघातात तरुणाचा मृत्यू; रनेरा येथील घटना

0
18

तुमसर,दि.14– पोलिस स्टेशन सिहोरा अंतर्गत असलेल्या हरदोली/सि येथील तरुणाचा कार अपघातात मृत्यू झाल्याची घटना 13 मे रोजी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास घडली. रवी पांडुरंग कटरे (वय 35) असे मृतकाचे नाव आहे.
तुमसर-बपेरा राज्यमार्गाने रवी पांडुरंग कटरे हे आपल्या कार क्रमांक एमएच 36/एफ 0282 ने सिहोरा वरून स्वगावी हरदोली येथे जात होते. मात्र असलेल्या रनेरा डागबंगला परिसरातील वळण मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या कारचा अपघात झाला. यावेळी गंभीर जखमी अवस्थेत रवी कटरे याला सुभाषचंद्र बोस शासकीय रुग्णालय तुमसर येथे दाखल करण्यात आले. परंतु उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.