अकोला दंगलीप्रकरणी 30 जणांना अटक

0
14

अकोला-अकोल्यात शनिवारी रात्री उसळलेल्या दंगलीनंतर ३० जणांना अटक करण्यात आली असून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली.

नक्की प्रकरण काय?

शहरातील जुने शहर पोलिस ठाण्याअंतर्गत दोन गटांमध्ये रात्री दंगल उसळली. या दंगलीत रस्त्यावर उभ्या वाहनांची तोडफोड करण्यात आली, तर दुसरीकडे दगडफेकही सुरू होती. रात्री उशिरापर्यंत पोलिस दंगल नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करीत होते. या दगडफेकीत काही नागरिकही जखमी झाले.

तणावाच्या ठिकाणी कलम 144 लागू करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहरात राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय वाशिममधून अतिरिक्त कुमकही मागवण्यात आली आहे. शहरात शांतता रहावी, यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.अकोल्यात शनिवारी रात्री उसळलेल्या दंगलीनंतर राज्याचे गृहमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे सतत पोलिस महासंचालक तसेच अकोला पोलिसांच्या संपर्कात आहेत. तसेच दंगलप्रकरणी आतापर्यंत ३० जणांचा अटक करण्यात आली आहे.शहरातील जुने शहर पोलिस ठाण्याअंतर्गत दोन गटांमध्ये रात्री दंगल उसळली. या दंगलीत रस्त्यावर उभ्या वाहनांची तोडफोड करण्यात आली, तर दुसरीकडे दगडफेकही सुरू होती. रात्री उशिरापर्यंत पोलिस दंगल नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करीत होते. या दगडफेकीत काही नागरिकही जखमी झाले