माजी जि.प.सदस्य रोहडा यांचा कार अपघातात मृत्यू

0
30

गोरेगाव,दि.19- येथील पोलीस स्टेशन अंतर्गत जानाटोला ते भंडगा दरम्यान आज शुक्रवारला सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास झालेल्या कार अपघातात माजी जिल्हा परिषद सदस्य गोंदिया निवासी श्रीचंद रोहडा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.श्रीचंद रोहडा हे तालुक्यातील कुर्हाडी ग्रामपंचातीचे सरपंच तसेच या क्षेत्रातूनच ते जिल्हा परिषदेचे सदस्य बहुजन समाज पक्षाच्यावतीने राहिले.त्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे.