आत्महत्येचा प्रयत्न करणाèया बुकीला नाव न सांगण्यासाठी लाखो रुपये देणारे ते कोण?

0
20

आयपीएलच्या हंगामात जोमात सट्टा,गोंदिया वगळता विदर्भात पोलीस कारवाया

गोंदिया : सध्या आयपीएल क्रिकेट जोरात सुरू आहे. आयपीएल क्रिकेट मध्ये सट्टा मटका बुकीचे चांगलेच फावते आहे. यातुनच काही दिवसांपूर्वी गोंदिया येथील एका आयपीएल सट्टा मटका बुकीने आत्महत्येचा प्रयत्न केलेला होता.या बुकीने आपले नाव पोलिसांना तपासादरम्यान न सांगण्यासाठी कुरखेडा, नागपूर व गोंदिया येथील काही बुकींना मोठी रक्कम मोजावी लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.पोलीसांना जबाब न नोंदविण्यासाठी कुरखेडा,देसाईगंज,नागपूर व गोंदिया येथील सट्टा किंग असलेल्यांनी या आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाèया इसमाला चक्क ८-१० लाख रुपये मोजावे लागल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.मात्र तेच बुकी आत्ता असे काही झालेंच नाही असे बोलून इमानदारीचा सोंग घेऊन बसले आहेत.
आता परत याच सट्टा मटका बुकीने आयपीएलच्या पाश्र्वभूमीवर पुर्व विदर्भात आयपीएल सट्टा मटकाचे ऑनलाईन सट्टा पट्टी व्यवसायाचे जाळे पसरवलेले आहेत.दररोज घरबसल्या लाखो रुपयांची कमाई करित असुन या मोबदल्यात यंत्रणेला देखील मोठा हप्ता दिल्या जात असल्यानेच कारवाई केली जात नसल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
गोंदिया येथील एका माजी नगरसेवक सट्टा बुकीने जवळपास चौदा लाख रुपये रुपये सट्टयात हरल्यावर ग्राहकांनी तगादा लावल्याने निराशेने ग्रस्त होऊन विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता सट्टा पट्टी व्यवसायात झालेल्या आर्थिक नुकसान झाले आहे.याबाबतचे जबाब पोलीसासमोर न देण्यासाठी कुरखेडा,नागपूर व गोंदिङ्मा येथील बुकींचे नाव पोलीसांना न सांगण्यासाठी चक्क कुरखेडा,देसाईगंज येथील बुकीला सात लाख,नागपूर येथील संतोष बुकी व गोंदियाच्या एका बुकीला ७-१० लाख रुपये मोजावे लागल्याची प्राथमिक माहिती त्यांच्याच गोटातून बाहेर आली असून बुकींनी भरपाई रक्कम देऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत तेरी भी चूप मेरी भी चूप असा प्रकार केल्याचे बोलले जात आहे.
सदर प्रकरणात घरगुती आर्थिक कारणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा जबाब देऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न प्रकरणाने पुन्हा डोके वर काढल्याने या प्रकरणाची पुन्हा चर्चा पुर्व विदर्भातील सट्टा व्यवसायिकामध्ये सुरु झाली आहे.तर पोलीस खरंच या प्रकरणाची सखोल चौकशी करुन सत्य बाहेर आणणार की शांत बसणार याकडे लक्ष लागले आहे.
मामा भाचा यांचा सट्टा पट्टी व्यवसाय तेजीत
सध्या आयपीएल क्रिकेट जोरात सुरू आहे. ३१ मार्च पासुन सुरु झालेला आयपीएल १ जुन पर्यंत आहे.गडचिरोली जिल्ह्यात ङ्मावर पोलिसांनी चांगलाच वचक ठेवले असतानाच देसाईंगज येथे दोन आरोपींना सट्टाप्रकरणात ताब्यात घेतले आहे.जसजसे दिवस कमी होतील तसतसे आयपीएल रोमांच वाढणार असून आयपीएल ऑनलाईन सट्टा पट्टी व्यवसायाला देखील तेजी येत आहे. याचा पुरेपूर फायदा घेत कुरखेडा येथील जगदीश व लखन नामक या मामा भाचा जोडींने पुर्व विदर्भात जागोजागी सट्टा पट्टीचे दुकान उघडल्याचे बोलले जात आहे. या दोघांची आपली ऑनलाईन सट्टा पट्टीची आयडी गोंदिया येथील बुकींकडे असुन संपूर्ण हवाला व्यवहार तेथून चालविले जात असल्याची चर्चा समोर आली आहे.
राज्यातील मटका बंद करूच अशा घोषणा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या करीत असले, तरी मटका आणि सट्टा सहजासहजी बंद होणे अवघड असल्याचे चित्र आहे. पूर्वी खूप कसरतीने चालविण्यात येणारा हा धंदा आता अत्याधुनिक तंत्राची जोड मिळाल्याने बिनधास्त व बेधडक सुरू असल्याकडे जाणकार लक्ष वेधत आहेत.
गृहमंत्र्यांच्या पालकमंत्री असलेल्या गडचिरोली,वर्धा, भंडारा,अमरावती जिल्ह्यासह वनमंत्री पालकमंत्री असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आजही हे धंदे राजरोसपणे फोफावत असल्याचे चित्र असून, पोलिसांकडून थातुरमातुर कारवाई करुन सोडले जाते. पूर्णपणे अटकाव मात्र होतांना दिसत नाही.
रस्त्याकडे पाठ करून असलेल्या टपèया, तेथे गुपचूप होणारे सट्टा पट्टी,मटका बुकिंग, तेथेच जाहीर होणारा निकाल आणि हवाला पद्धतीने होणारे पैशाचे वाटप, अशी स्थिती काही काळापूर्वी या धंद्याची होती. आता मात्र मोबाइल, इंटरनेट अशा प्रगत व ऑनलाईन माध्यमांचा वापर या धंद्यात होऊ लागल्याने पोलिसांना गुंगारा देणे सोपे झाले आहे. सट्टा पट्टी,मटका खेळणाèयांमध्ये मोठ्या प्रमाणात युवक सरसावले आहेत.हमाल, मजुरांपासून उच्च शिक्षित आणि व्यापारी, व्यावयायिकांचाही सहभाग वाढू लागला आहे. नेहमीच्या ग्राहकांना घरपोच सेवा दिली जाऊ लागल्याने सट्टा पट्टी मटका नेमका चालतो कोठून हे शोधून काढणे पोलिसांसाठी अवघड बनले आहे.
कुरखेडा,देसाईगंज येथील मामा भाचा असलेल्ङ्मा मटका व्यावसायिकांचा पुर्व विदर्भात मटका चालतो. त्यासाठी मुख्य बुकी आणि त्यांचे सबएजंट अशी साखळी आहे. ते आपापल्या पद्धतीने बुकिंग करतात. अर्थात या नेटवर्कची पोलिसांना अजिबातच माहिती नाही, असेही नसते. वरिष्ठांचे आदेश आले की, पोलीस काही किरकोळ व्यावसायिकांवर कारवाई करतात. ती करतानाही मालकापेक्षा नोकरालाच अटक केली जाते.
त्यामुळे, काही दिवसांत पुन्हा धंदा सुरू होतो. गृहमंत्री तथा उपमुख्यमत्र्ङ्मांनी घोषणा केल्यानंतरही पुर्व विदर्भात ऑनलाईन सट्टा पट्टी सुरूच असल्याचे आढळून येत असल्याने सखेद आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

रामनगर पोलीस ठाणे हद्दीत येणार्या बालाघाट मार्गावरील नामाकिंत असलेल्या जिंजल हॉटेलमध्ये बालाघाट पोलिसांनी धाड घालून आयपीएलवर सट्टा लावणाèङ्मा दोघांना ताब्यात घेतले.मात्र गोंदियाच्या रामनगर पोलिसांना या प्रकरणाची माहिती सट्टाआरोपींना ताब्यात घेतल्यानंतरही बालाघाट पोलिसांनी का दिली नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे.जेव्हा की बाहेरच्या पोलिसांना स्थानिक पोलिसांना कारवाई करतांना माहिती देणे कायदेशीर बंधनकारक असताना या प्रकरणात बालाघाट पोलिसांनी केलेली टाळाटाळ शंका निर्माण करणारी ठरली आहे.बालाघाट पोलिसांच्या या कारवाईनंतरच्या प्रसारमाध्यमांच्या बातमीनंतर स्थानिक पोलिसांनी सदर हॉटेलात चौकशी करुन माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला.
विदर्भातील सर्वच जिल्ह्यात आयपीएल सट्टेबाजांवर कारवाई होत असतांना गोंदियात मात्र शांतता आहे, गेल्यावर्षी गोंदिया पोलिसांनी ८-७ कारवाया आयपीएलच्या सट्टेबाजांवर केलेल्या होत्या. त्यातच रामनगर व शहर ठाण्यातील काही कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून गोंदियातील बुकींशी व सट्टाव्यवसायिकांशी संपर्क साधून वरिष्ठांना खूश करत असल्याची चर्चा आहे.येथील शहर ठाण्याती त्या कर्मचार्याची बदली इतर कुठेही झाली तरी तो येथेच परत का येतो याचा शोध कधीच घेतला गेला नाही.
दुसरीकडे याच ठाण्यातील इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी मात्र या पोलीस अधिकाèयाच्या वागणुकीमुळे नाराज असल्याचे वृत्त आहे.पोलीस उपनिरीक्षक, सहा.पोलीस निरिक्षकांच्याही कामात ढवळाढवळ करुन आरोपींचा तर कधी कारवाई करण्यापासूनच्या कामात अडथळा आणत असल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळेच बालाघाट येथूून येणारे बुकी गोंदियात बिनधास्त आयपीएल सट्टा चालवत आहेत.येथील भाजी मार्केटमध्ये फळांची दुकान दाखवून क्रिकेटच्या सट्टाबाजीचा व्यवसाय करणारा एक इसम तर राजकीय नेत्यांच्या पाठबळ घेत फळविक्रीच्या आडून क्रिकेटच्या सट्टाव्यवसायात  रमला आहे,अशा अनेक सट्टाबाजांची आर्थिक बाजू गोंदियातील काही चांगले राजकारणी सांभाळत असल्याचे बोलले जाते.व्यवसायातील कमाईला पांढरे करण्याकरीता कुणी मोबाईलदुकान,किराणा,तेल, कापडाची,फळ,हॉटेलसारखे प्रतिष्ठान उघडून आपला व्यवसाय बिनधास्त करीत असतांना आणि सध्याच्या आयपीएलचा हंगा‘ संपत आलेला असतांना गोंदिया पोलिसांना या प्रकरणात सुगावा न मिळणे आश्चर्यच म्हणावे लागेल.

‘गोंदिया शहरात कुठे सट्टाव्यवसाय चालत असल्याची माहिती नागरिकांकडून मिळाल्यावर आमच्यावतीने त्या दिशेने तपास करुन सट्टा व्यवसायीकांवर कारवाई करण्याचे निर्देश सबंधित पोलीस ठाण्यांना दिलेले आहेत.पोलीस प्रशासन शांत बसून नसून प्रत्येक हालचालीवर नजर ठेऊन आहे.शहरातील अवैध व्यवसायावर लगाम लावण्याचे काम पोलीस करीत आहे,अशातही सट्टा व्यवसाय सुरु असेल तर आम्ही नक्कीच कारवाई करु.सोबतच बालाघाट पोलिसांनी आयपीएलप्रकरणी केलेल्या कारवाईची माहिती स्थानिक पोलिसांंना देणे गरजेचे असतानाही दिले नाही,यावरुन त्या कारवाईबद्दलही आम्हाला अधिकृत काही बोलता येणार नाही. सुनिल ताजणे,उपविभागीय पोलीस अधिकारी,गोंदिया

‘मटकासारख्या जुगार अड्ड्यावर कारवाई सुरूच असून, त्या दृष्टीने प्रत्येक पोलीस स्टेशनला तशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार दररोज जुगार अड्डे उद्धवस्त केले जात आहेत. पोलीस कर्मचारी मटका चालविणाèयांचा शोध घेऊन, तसेच नागरिकाच्या तक्रारी आल्यानंतर कारवाई केली जात आहेङ्क.
निलोत्पल बसु, पोलीस अधीक्षक गडचिरोली