भाजपा प्रदेश पदाधिकाऱ्याची ‘स्कॉर्पिओ’ जाळली!

0
17

बुलढाणा : चिखली येथील रहिवासी तथा भाजपाच्या उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष स्वप्नील गुप्ता यांचे चारचाकी वाहन (स्कॉर्पिओ कार) शनिवारी रात्री जाळण्यात आले. यामुळे वाहनाचा केवळ सांगाडाच उरला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.चिखली येथील जयस्तंभ चौक परिसरात गुप्ता यांचे निवासस्थान आहे. त्यांनी नेहमीप्रमाणे आपले वाहन घराच्या मागील भागात उभे केले होते. रात्री आवाजाने ते जागे झाले. यावेळी त्यांना वाहन पेटल्याचे दिसून आले. गुप्ता यांनी घटनेची माहिती चिखली पोलिसांना दिली. पोलिसांनी ‘सीसीटीव्ही फुटेज’ वरून एका इसमास ताब्यात घेतले.