११ दिवसीय समर कॅम्प शहारवानी येथे संपन्न

0
31

गोरेगाव,दि.22-पाथ फाइंडर शिक्षण संस्था , गोंदिया द्वारा संचालित स्कॉलर प्री. प्रायमरी स्कूल शहारवानी येथे ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना त्यांच्यामधील कलागुणांची ओळख व्हावी.आणि या प्रतिभा विकसित करता याव्यात, तसेच विद्यार्थ्या मधला न्यूनगंड संपवून आत्मविश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने ११ दिवसीय समर कॅम्पचे आयोजन ११ ते २१ मे २०२३ काळात सकाळी ६.३० ते १०.०० वेळेत स्कॉलर प्री. प्रायमरी स्कूल शहारवानी येथे करण्यात आले.
या शिबिरामध्ये विविध विषयातील पारंगत व्यक्तींचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. शिबिरामध्ये विद्यार्थ्यांकरिता शारीरिक शिक्षण, योग, मेडीटेशन, गणित , इंग्रजी, सामान्य ज्ञान , रंगकला, चित्रकला, पेपर आर्ट, थ्रेड आर्ट, लिफ आर्ट, पेटल आर्ट, मॉडेल बनविणे, पणपोई बनविणे, विविध एकल व सामूहिक खेळ, गितगायन, नृत्यकला अश्या विविध विषयावर प्रात्यक्षिक – प्रशिक्षण देण्यात आले.या शिबिराच्या आयोजनात मोलाचे सहकार्य करणाऱ्या मीना दिलीप पटले , रजनी भावे,भारती उईके,कल्पना चौहान आणि पूजा भावे यांचा सत्कार करण्यात आला.या शिबराचा ४८ विध्यार्थ्यांनि लाभ घेतला.
या शिबिराच्या , समारोप सत्राचे सुचारू संचालन त्रिग्य चौहान यांनी तर आभार प्रदर्शन पूर्वी पटले यांनी केले . या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी स्कॉलर प्री. प्रायमरी स्कूल, शहारवानी च्या मुख्याध्यापक शीतल चौहान,मीना पटले , रजनी भावे,भारती ऊईके, कल्पना चौहान आणि पूजा भावे यांनी अथक परिश्रम घेतले. तर ग्राम प्रशासनातील पदाधिकारी व पालक यांचे सहकार्य लाभले.