कणकवलीत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड 12 जण ताब्यात

0
15

कणकवली :-कणकवली तालुक्यातील नागवे रोडवर जंगल भागात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कणकवली पोलिसांनी पहाटे 3 वाजता धाड टाकली. यावेळी चार चाकी आणि दुचाकी यांच्यासह १२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात वाहनांसह मोबाईल ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात यांनी दिली.हे सर्व कणकवली, मालवण, सावंतवाडी, कुडाळ येथील होते. येथील अंधाराचा फायदा घेत काही जण आपली वाहने तेथेच टाकून पसार झाले. पहाटेच्या सुमारास अचानक धाड पडल्याने अंधाराचा फायदा घेत काही जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. यात पळताना काही जण किरकोळ जखमी झाल्याची देखील चर्चा कणकवलीत सुरू आहे.

️️या कारवाईत जयवंत आत्माराम बाईत( वय ४९ वर्षे, रा. कणकवली तेलीआळी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग), सिध्देश भास्कर ठाकुर, (वय ३९ वर्षे, रा. कलमठ लांजेवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग), संतोष बाळकृष्ण कुडतरकर( वय ५० वर्षे, रा. माणगाव बाजारपेठ, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग),विशाल वासुदेव सावंत (वय ४५ वर्षे, रा. सावंतवाडी वैश्यवाडा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग), केतन रावजी ढोलम( वय ३५ वर्षे, रा. कोळ आडारीवाडी, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग, मुळ रा. मुंबई), महेश गंगाधर जोगी (वय ३२ वर्षे, रा. मालवण बाजारपेठ, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग), कुलराज भगवान बांदेकर ( वय २२ वर्षे, रा. मालवण जोशीवाडी, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग), शुभम कृष्णकांत मिठबावकर, (वय २२ वर्षे, रा. मालवण हडी, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग), रोहन जितेंद्र वाळके (वय २९ वर्षे, रा. मालवण देऊळवाडा, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग), हेमराज प्रकाश सावजी (वय ३० वर्षे, रा. वायरी भुतनाथ, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग), विनायक शिर्के (कलमठ कणकवली), सहील आचरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात यांनी दिली अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.