लाखेगाव येथील आरोग्य सेविकेच्या विनयभंग व मारहाण

0
44
वाढदिवसाच्या शुभेच्छा

तिरोडा- लाखेगाव येथील उपकेंद्रात कार्यरत आरोग्य सेविका श्रीदेवी प्रेमलाल उके (वय 38 ) यांना दोन जणांनी क्षुल्लक कारणावरून अश्लील व जातिवाचक शिवीगाळ आणि मारहाण केली.
आरोग्य सेविकेने तिरोडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारींनुसार , सोमवार दि. २९ मे ला रात्री १२:०५ वाजता सौ. रितु अमीर चौधरी (२२) रा. सातोना ही गरोदर माता प्रसुती वेदना सुरु झाल्याने ती प्रसुती करिता उपकेन्द्रा मध्ये दाखल होन्या करीता आली. तिला गाडीतून खाली उतरविले व गरोदर मातेला उपकेंद मध्ये दाखल केले. गाडीमधुन सामान उतरवायला तिचे नातेवाइक गाडीजवळ गेले असता. तिथे नितीन मोहनलाल देशमुख (वय ३०) रा. लाखेगाव तिथे पोहोचला व गाडी इथे का ठेवली असे म्हणत त्यांना शिवीगाळ करू लागला. भांडण सोडवुन त्यांना समजावण्याकरिता आरोग्य सेविका तिथे आली असता तिला अत्यंत अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ केली. तितक्यात आरोपीचा भाऊ अश्विन मोहनलाल देशमुख (२६) तिथे पोहोचला. आरोग्य सेविकेचा मुलगा व पती तिला वाचवण्याकरता तिथे आले असता दोन्ही आरोपींनी जातीवाचक शिव्या देत मारहाण केली व आरोग्य सेवीकेचे कपडे फाडले आणि बलात्काराची व जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांचे वडील जियालाल गोसाई देशमुख (५८) तिथे आले व त्यांनी या दोघांना प्रोत्साहित केले.
तिरोडा पोलिसांनी भा. दं. वि. ३५३,३५४,३५४ब, ३२३, २९८, ५०६,५०९, ३४ व अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.