ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकची विजेच्या खांबाला धडक

0
19

तिरोडा- तालुक्यातील पांजरा येथे रविवारला रात्री 11 ते 11.30 च्या दरम्यान ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक विजेच्या खांबाला धडकला.सदर ट्रक क्र. MH.35 AJ 7626 खोमेन्द्र रहांगडाले रा. बोदलकसा यांच्या मालकीच्या असून अडाणी मधून राख भरून डोंगरला (तुमसर) येथे गेला व रिकामी करून परत येताना ट्रकच्या ड्रायव्हर शैलेश नेवारे रा. तिरोडाचे नियंत्रण सुटुन गावाजवळ रस्त्यालगत असलेल्या विद्युत खांबावर व बाजूला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर वर आदळली. त्यामुळे विद्युत खांब व विद्युत तारा तुटुन विद्युत प्रवाह खंडित झाला. ट्रॅक्टरचेदेखील मोठे नुकसान झाले. पुढील तपास तिरोडा पोलीस करीत आहेत.