मध्यप्रदेश येथून गांजा पुरवठा करणारा गोंदिया पोलीसांचे ताब्यात

0
14

गोंदिया,दि.29-अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवितांना 25 मे रोजी पानगाव, आमगाव ते सालेकसा जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचून मध्यप्रदेशातून गांज्याची वाहतूक होत असल्याचे माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच सापळी रचून अंमली पदार्थ कायद्यान्वये कारवाई करीत 50 हजार रुपयाच्या मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणात आरोपी चंद्रभान जियालाल नागपुरे वय 26,खोळगड,तालुका सालेकसा हा 25 मे रोजी सायंकाळचे दरम्यान 0.815 किलोग्रॅम गांजा किंमती 17,930/- रूपये व मोटर सायकल किमती 50 हजारसह ताब्यांत घेत गांजा जप्त करीत पोलीस स्टेशन सालेकसा येथे आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आरोपीवर पो.ठाणे सालेकसा येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक गोंदिया, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय भिसे यांनी ठाणेदार सालेकसा यांना गुन्ह्यांचे अनुषंगाने तपास सूचना केल्या होत्या व सदर गुन्ह्यातील आरोपी कडून गांजाचा पुरवठा करणारा कोण,कुठून गांजा आणला आहे. या संबंधात सखोल चौकशी करून तपास करण्याच्या सूचना देऊन निर्देश दिले होते.या अनुषंगाने वरिष्ठांचे तपास सूचनेप्रमाणे व अदेशान्वये पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने पुरवठाधारक याचा शोध घेऊन गांजाचा पुरवठा करणारा भूवनलाल केसरीमल कालबेले वय 55 वर्षे राहणार कुंभारी कला पो . ठाणे लांजी, तालुका- लांजी, जिल्हा- बालाघाट (मध्यप्रदेश) यास सापळा रचून त्याचे राहते घरून 28 मे रोजी ताब्यात घेतले. त्याचे घरझडतीत 2.666 kg गांजा किमती 58,652/ – रुपयांचा असा गुन्ह्यात जप्त करण्यात आला असून गुन्ह्यात एकूण 3 कीलो 481 ग्रम गांजा किमती 76,582/- रुपये मोटर सायकल किंमती 50, हजार सह किंमती एकूण 1 लाख 26,582/- रुपयां चा मुद्देमाल गुन्ह्यात जप्त करण्यात आला आहे. गांजाचा पुरवठा करणारा आरोपी यास गुन्ह्याचे अनुषंगाने तसेच गांजाच्या पुरवठा संबंधाने अधिकची विचारपूस व सखोल चौकशी करण्यात येत आहे.

स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया येथील पथक पो . नि.दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात पोहवा ठाकरे, गायधने , पटले पोशी भांडारकर, आणि पो.ठाणे. सालेकसा येथील तपासी अधिकारी पो. नि श्री. बाबासाहेब बोरसे, पो. उप. नि. गणेश शिंदे,पोना. इंगळे , पगारवार ,गौतम वेदक , मपोशि अंबाडारे यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. केलेल्या कामगिरीची माननीय वरिष्ठांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.