वन विभागाची कारवाई ; अवैध सागवन साठा जप्त

0
11

 वन परिक्षेत्र गोठणगांव क्षेत्रातील बोरटोला येथील घटना 

अर्जुनी मोर.:– तालुक्यातील जिल्ह्याच्या अखेरच्या टोकावर असलेल्या मौजा बोरटोला येथिल एका घरातून अवैध सागवन साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई ( ता.26 ) सकाळी ६.३० ते ७ दरम्यान करण्यात आली.अवैध सागवन साठयासह ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव संजय ताराचंद मडावी रा. बोरटोला असे आहे.वनपरिक्षेत्र कार्यालय गोठणगाव अंतर्गत येत असलेल्या सहवनक्षेत्र तिरखुरी बिट तीरखुरी १ येथील बोरटोला येथे अवैध सागवान असल्याची गुप्त माहिती वनविभागाला प्राप्त झाली त्या आधारे (ता.२६) सकाळी ६.३० च्या सुमारास उपवनसंरक्षक वन विभाग गोंदिया तसेच प्रकाष्ट निष्कासन अधिकारी नवेगाव बांध यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी विजय तेलंग यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळ गाठुन कारवाई केल.कारवाई दरम्यान ०.२४६ घ.मी.१९ नग अवैध सागवान आढळून आला तो सर्व मौल्यवान सागवन चिरान जप्त करून वन विभागाच्या कार्यालयात जमा करण्यात आला.पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी विजय तेलंग करत आहेत.

‘‘ वनविभागाला अवैध सागवान लाकडांची कटाई होत असल्याची माहिती प्राप्त झाली मिळालेल्या माहितीच्या आधारे आज सकाळच्या सुमारास वनपरिक्षेत्राधिकारी विजय तेलंग यांच्यासह क्षेत्र सहायक एच.आर मेश्राम, सि.व्ही.नान्हे ,वनरक्षक पटले, कु दखने, कु प्रियंका मेश्राम, कु लटये, कु डोंगरे, कु ऊईके, कु आगाशे, परशूरामकर यानी १४५०० रुपये किमतीच्या सागवान वृक्षांची चोरटी तोड पकडण्याची कारवाई वनविभागाच्या वतीने करण्यात आली. ’’