वनपरिक्षेत्र कार्यालय परीसरात फळ झाडांची लागवड
अर्जुनी मोरगावPसमृद्ध व आनंदी जीवनासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक असून तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे,असे प्रतिपादन प्रकाष्ट निष्कासन अधिकारी एस.जी अवगान वन विभाग नवेगाव बांध यांनी वृक्ष लागवड कार्यक्रम प्रसंगी केले.स्थानिक वनपरिक्षेत्राधिकारी एस.डी.खोब्रागडे यांच्या संकल्पनेतून, अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या पटांगणात सर्व कर्मचाऱ्यांच्या श्रमदान आणि आर्थिक सहाय्यातून (ता.२४) वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वी.व्ही.तेलंग वनपरिक्षेत्र अधिकारी गोठनगाव स्थानिक वन परिक्षेत्राधिकारी एस.डी.खोब्रागडे ई.प्रामुख्याने उपस्थित होते.
वन परिक्षेत्र परिसरात आंबा काजू पेरू काळाजाम एप्पल बोर ई. अनेक बहुमूल्य फळ झाडांची लागवड करण्यात आली.यावेळी प्रकाष्ट निष्कासन अधिकारी एस.जी.अगवान यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की,‘’. वाढत्या औद्योगीकरणामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होऊन पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे.त्यासाठी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.पर्यावरणाचे रक्षण करणे हे आणि संवर्धन करणे प्रथम आपले कर्तव्य आहे.त्याचप्रमाणे नागरिकांनी ही लागवड करून झाडांचे संगोपन करणे तितकेच महत्वाचे आहे.’’ऑक्सिजन प्रदान करून, हवेची गुणवत्ता सुधारून, हवामान सुधारणे, पाणी वाचवणे, मातीचे रक्षण करणे आणि वन्यजीवांना आधार देऊन झाडे त्यांच्या पर्यावरणाला दीर्घकाळ योगदान देतात.असेही ते यावेळी म्हणाले.
वनपरिक्षेत्राधिकारी खोब्रागडे मार्गदर्शन करतांना म्हणाले ‘निसर्गाच्या विरूद्ध कुणीही जाऊ नये प्रत्येकाने निसर्गाचे रक्षण केले पाहिजे.फक्त झाडे लावून उपयोग नाही त्यांची काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. झाडे आहेत म्हणून आपण आहोत याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे.आपल्या देशात जमीनही आहे आणि लोकांकडे पुरेसा वेळही.आपण जर ठरविले तर भविष्यात जगाला प्राणवायू पुरवणारा देश म्हणून आपण भारताचे स्थान निर्माण करू शकतो.यावेळी वनपरिक्षेत्र कार्यालय क्षेत्रातील वनपाल वनरक्षक वन मजूर बहुसंख्नेने उपस्थित होते.