गोंदिया ता.30 :-येथील कुंभारे नगरात चोरट्यानी घरफोडी करून एलईडी टीव्ही लंपास केली आहे.ही घटना 26 ऑगस्टच्या रात्री दरम्यान घडली. दरम्यान शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड विधानाची कलम 380 आणि 457 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.शहर पोलिसांनी मौका चौकशी करून माहिती घेतली.
या प्रकरणी सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी हिंदराज बोरकर रा. कुंभारे नगर (वय 70)हे चंद्रपूर येथे काही दिवसांपासून आपल्या मुलीकडे राहतात. कधी कधी गोंदियाला येतात.त्यांचे येथील घर हे सुने असल्यामुळे चोरट्यानी हिच संधी साधून मुद्देमाल लंपास केला.कुंभारे नगरात यापूर्वीही मोठया प्रमाणात चोऱ्या झाल्यामुळे येथील रहिवास्यांमध्य भीतीचे वातावरण आहे.
नगरातील लोकांनी सांगितले की, येथे मोठ्याप्रमाणात अनोळखी (शातीर चोर) दिवसभर फिरत असतात. येथे असलेल्या पडक्या घरात त्यांचा घोळका बसतो. येथेच बसून ते चोरी करण्याचा बेत आखतात. नगरात फिरून सुन्या घराची माहिती करून घेतात, आणि नन्तर घरफोडी करून घरातील दागिने, नगदी राशी आणि इलेक्ट्रानिक वस्तू लंपास करून पोबारा करतात. या चोरट्यावर करडी नजर ठेवून पोलिसांच्या स्वाधीन करण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन समाज बांधवानी केले आहे.
फिर्यादी श्री बोरकर यांनी सांगितले की, घरातील काही मुद्देमाल ज्यामध्ये कॉम्प्युटर, कपडे वगैरे हेही चोरण्यासाठी चोरट्यानी तय्यार ठेवले होते. परंतु कॉम्प्युटर हा एका नातेवाईकांनी आपल्याघरी सुखरूप नेऊन ठेवल्यामुळे तो लांबवीला गेलेला नाही.
कुंभारे नगरात एवढया प्रमाणात चोऱ्या होणे म्हणजे चोरटे हे जवळपासचे असावेत. यापूर्वीही 3-4 घरी चोऱ्या झालेल्या आहेत. कुंभारे नगर वासियांनी 50 ते 60 महिला पुरुषांनी SP साहेबांना भेटून या परिसरात एक पोलीस गस्त लावन्यासाठी विनंती करावी व शिस्टमंडळ भेटून तसे निवेदन त्यांना देण्याचे ठरले.