गोंदिया,दि.30ः येथील गोंदिया पब्लिक स्कूलच्या वतीने गोंदिया ग्रामीण व शहर पोलीस ठाणे येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंदिया ग्रामीणचे पोलीस निरिक्षक सचिन म्हेत्रे व शहर पोलीस ठाण्याचे सपोनी सागर पाटील होते.प्रमुख उपस्थितीमध्ये गोंदिया पब्लीक स्कुलच्या समन्वयक नाहीदा खान उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन पिंकी रहांगडाले यांनी केले.गोंदिया पब्लिक स्कूल येथील नर्सरी 1 च्या 19 विद्यार्थी व विद्यार्थिनीनी गोंदिया शहर पोलीस ठाणे येथील अधिकारी व पोलीस अमलदार यांना राखी बांधली.जनतेचे रक्षक पोलीस असल्याने लहान विद्यार्थ्यांमध्ये पोलीस हे जनतेचे रक्षक आहेत अशी भावना रुजविणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.सदर कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पोलीस अमलदारांना राखी बांधून रक्षेचे वचन मागितले.पोलिसांकडून चिमुकल्या विद्यार्थ्यांना व स्टा्फॅला रक्षेचे वचन देण्यात आले.गोंदिया पब्लिक स्कूल गोंदिया येथील कु. पूर्वा नैखाने, सृष्टी शुक्ला, समीना खान तसेच इतर स्टाॅफ उपस्थित होते.