वर्धा : कारंजा तालुक्यातील नारा येथील यादवराव केचे आदिवासी आश्रमशाळेत शिवम उईके या बारा वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तो मेळघाट येथील डोमा गावचा रहिवासी होता.
ही आश्रमशाळा आर्वीचे आमदार दादाराव केचे यांच्या संस्थेची आहे. आज सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन होणार आहे. रात्री नऊ वाजता ही घटना उजेडात आली. प्राप्त माहितीनुसार रात्री मुलं झोपायची तयारी करीत असताना गाद्या काढण्यास गेले होते. त्यावेळी ही घटना उजेडात आली. माहिती मिळताच कारंजा पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली.आमदार केचे म्हणाले की, अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे. दुपारी मुलं गादी वर गादी रचून खेळत होते. नंतर काही निघून गेले. त्यात हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता मुलं बोलून दाखवीत आहे. या आश्रमशाळेत इतर कुठेही नसतील इतक्या सुविधा आहेत. काहीच निष्काळजीपणा होत नाही. मात्र झाले ते वाईटच. पोलीस चौकशी सुरू आहे.