प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाचा ८ वा स्थापना दिन १ रोजी

0
6

– विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार सत्कार

गोंदिया :-प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाचा 8 वा स्थापना दिन कार्यक्रम १ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. परंपरेनुसार या कार्यक्रमात जिल्हृयातील समाजकार्य, कला व साहित्य, कृषी, शिक्षण, प्रशासकीय व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या व्यक्तींची व संस्थेची निवड करून त्यांचा गौरव पुरस्कार देवून सत्कार करण्यात येतो. तसेच पत्रकारिता क्षेत्रातील जीवन गौरव पुरस्कार प्रदान केले जाते. शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता हॉटेल जिंजर (गेटवे) येथे स्थापना दिन व सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन खा.सुनिल मेंढे यांच्या हस्ते प्रेस ट्रस्ट ऑफ गोंंदियाचे अध्यक्ष अपूर्व मेठी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आ.विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे तर प्रमुख पाहुणे म्हणुन माजी मंत्री डॉ.परिणय फुके, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे, अदानी प्रकल्पाचे उप प्रबंधक पियुष दिगावकर आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावर्षी प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियातर्फे स्व.रणजितभाई जसानी स्मृति प्रित्यर्थ जिल्हा गौरव सामाजिक सेवा पुरस्कार पर्यावरण व प्राण्यांसाठी सेवाकार्य करणारे रघुनाथ भुते, स्व.रामकिशोर कटकवार स्मृति प्रित्यर्थ जिल्हा गौरव कर्तव्यनिष्ठ पुरस्कार समग्र शिक्षा अभियानाचे कार्यकारी अभियंता जिवनेश मिश्रा, रामदेव जायस्वाल स्मृति प्रित्यर्थ जिल्हा गौरव कला व साहित्यरत्न पुरस्कार श्रीमती योगिता दिनेश मौजे, स्व.मोहनलाल चांडक स्मृति प्रित्यर्थ जिल्हा गौरव कृषीरत्न पुरस्कार श्रीमती त्रिवेणी गोविंद तुरकर, सहयोग संस्थेतर्फे शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा गौरव पुरस्कार शिक्षक मंगलमूर्ती सयाम यांना दिला जाणार आहे. विशेष सत्कारामध्ये क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हयातील प्रसिध्द धावक मुन्नालाल यादव यांचा स्व. प्रा. डॉ. योगेश नासरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ सत्कार करण्यात येणार असून पर्यावरण संवर्धन व नियमित व्यायामासाठी प्रोत्साहन व जनजागृती करणाऱ्या सायकलिंग संडे गृपचा गौरव केला जाणार आहे. तसेच या वर्षीचा प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाचा जीवन गौरव पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार लाटा यांना सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाचे रवि आर्य, संतोष शर्मा, जयंत शुक्ला, हिदायत शेख, अंकूश गुंडावार, जावेद खान, हरींद्र मेठी, कपिल केकत, प्रमोद नागनाथे, मुकेश शर्मा, नरेश रहिले, भरत घासले, आशिष वर्मा, योगेश राऊत, दिपक जोशी, सौ.अर्चना गिरी, बिरला गणवीर, आर व्ही जोशी आदिंनी केले आहे.