गोंदिया : ऑनलाइन गेमिंग (जुगार) च्या व्यसनामुळे तरुणांचे आर्थिक स्थितीसह मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे.क्रिकेट सट्टा आणि ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनामुळे गोंदियातील अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या बरबाद झाली आहेत. असाच एक हताश तरुण नीरज अशोक मानकानी (२४वर्ष, रा. बाबा भवन, चंद्रशेखर वॉर्ड, श्रीनगर, गोंदिया) यांनी ऑनलाईन गेमच्या व्यसनामुळे लाखो रुपये गमावल्यानंतर २८ जुलै रोजी स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेनंतर त्याच्या आईने तरुण मुलाच्या आत्महत्येचा धक्का सहन न होऊन तिच्या मुलाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या आणि बनावट गेमिंग अप्सच्या माध्यमातून तरुणांना जुगाराचे व्यसन लावून त्यांची फसवणूक करणाऱ्या सट्टेबाजांविरुद्ध आईच्या तक्रारीनंतर शहर पोलिसांनी या प्रकरणी आधी कलम १७४ अन्वये आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता.आता तपासात गुंतलेल्या पोलिसांना ठोस पुरावे मिळाल्यानंतर आणि मृतकची आई फिर्यादी ममता अशोककुमार मानकानी (५४, रा. बब्बा भवन चंद्रशेखर वॉर्ड श्रीनगर, गोंदिया) यांच्या तक्रारीवरून आरोपी चिराग फुंडे (रा. – सिव्हिल लाईन,गोंदिया) आणि आरोपी अभिजीत (रा. सेल टॅक्स कॉलनी, गोंदिया) याच्यासह मृतक तरुणाची स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी ऑनलाइन गेमिंग अप चालवून फसवणूक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले – मार्च २०२२ ते २०२३ या कालावधीत श्रीनगरमधील बाबा भवन परिसरात ही घटना घडली. ऑनलाइन पैशांवर खेळले जाणारे गेमिंग आणि बेटिंग म्हणजे ‘गजानन अप’, ‘महादेव अप’ आणि ‘रेड्डी’ अॅप’ चा आरोपींनी आर्थिक नफ्यासाठी मृतकाला जुगार खेळण्याची सवय लावली.या गेममध्ये सट्टा लावणाऱ्या सट्टेबाजांना नेहमीच फायदा होत होता आणि खेळणाऱ्या व्यक्तीला जुगारात पैसे गमवावे लागत होते. त्यावर नीरज मानकानी जुगार खेळताना त्याची कमाई गमावली. तो आपले सर्व पैसे ऑनलाइन गेमिंगमध्ये खर्च करायचा आणि फसवणुकीचा बळी ठरलेल्या तरुणावर लाखो रुपयांचे कर्ज झाले.
यानंतर सट्टेबाजांनी पैसे परत करण्याची मागणी करत नीरजवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आणि वारंवार त्रास देऊन तरुणाला आत्महत्या करण्यास भाग पाडले. बुकींच्या धमक्या आणि रोजच्या छळाला कंटाळून नीरजने आपल्याच घरात गळफास लावून घेतला.आता यात याप्रकरणी शहर पोलिसांनी आरोपींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे व फसवणुकीला बळी पडणे अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील करीत आहेत.