वाचन संस्कृती टिकविणे काळाची गरज– माजी आमदार दिलीप बंन्सोड

0
12

गोरेगाव – सध्याच्या स्पर्धेच्या युगातील तरूणांना व तरुणींना वाचनाशिवाय तरणोपाय नाही ग्रंथामधुन च समाजाच्या शाश्वत विकासाचे विचार दिले जातात ग्रंथामुळेच आधुनिक भारताची निर्मिती झाली आहे. केवळ शिक्षण क्षेत्रच नाही तर सर्वच क्षेत्रातील लोकांनी ग्रंथाचे वाचन करने आवश्यक आहे. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी वाचन गरजेचे आहे कू्र्तिशील प्रयत्न करावे जगातील एकमेव व्यक्ती भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी घर बांधले. आपणही वाचक होऊण आपली ज्ञानंसंपदा वाढवुया असे आवाहन माजी आमदार एव जिल्हा काँग्रेस कमेटी अध्यक्ष दिलीप बंन्सोड यांनी केले.गिधाडी येतील जयदुर्गा सार्वजनिक वाचनालयाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सांगितले.
तालुक्यातील गिधाडी येतील ब दर्जा ग्रंथालय जयदुर्गा सार्वजनिक वाचनालय चे २७ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप बंन्सोड तर प्रमुख अतिथी गोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष जगदीश येरोला, गोरेगाव कूर्षी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गिरधारी बघेले, कूर्षी उत्पन्न बाजार समिती चे संचालक यु टि बिसेन, कैलास डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य संसेन्द्र भगत,गिधाडी ग्रांम पंचायत चे सरपंच पुष्पाताई जयतवार, मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे, संस्थेचे अध्यक्ष वामनराव बिसेन, सचिव ग्रंथमित्र वाय डी चौरागडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक सचिव वाय. डी. चौरागडे यांनी २७ वर्षाचे प्रगती अहवाल सादर केले.तर कार्यक्रमाचे संचालन प्रा. सचिन नांदगाये तर आभार नरेंद्र कुमार चौरागडे यांनी केले. यावेळी संस्थेचे सदस्य पुरूषोत्तम ऊरकुडे,चुळामन कटरे, पुरूषोत्तम बहेकार,सावळराम ठाकुर, चंन्द्रकुमार चौरागडे,व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.