कोल्हापुरात प्रेमी युगुलाची आत्महत्या

0
9

कोल्हापूर -जिल्ह्यात हिंदू-मुस्लीम प्रेमी युगुलाने एकत्रित आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सानिका नानासो निकम (वय 16) आणि अरबाज शब्बीर पकाले (वय 18, रेणुका नगर शिरोली पुलाची) असे आत्महत्या केलेल्या हिंदू आणि मुस्लीम प्रेमी युगुलाचे नाव आहे. आज 2 सप्टेंबर 2023 रोजी ही घटना घडली. राहत्या घरी त्यांनी अंगल्ला नायलॉनने गळफास घेत आपले जीवन संपवले.ज्याच्यावर प्रेम केले त्याच्यासोबत मरायला पण तयार राहा, नाहीतर प्रेम करू नका. जात धर्म बघून प्रेम करू नका, सगळीच तशी नसतात, असे फोटो या प्रेमीयुगुलाने आधी इन्स्टाग्रामवर ठेवला. यानंतर त्यांनी आत्महत्या केली. मुलाच्या घरी या दोन्ही प्रेमीयुगलाने आत्महत्या केली. दोन्ही अल्पवयीन आहेत. हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथे घडलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.