संख/राजेभक्षर जमादार- आगामी दहीहंडी व गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उमदी पोलीस ठाणे हद्दीतील अवैद्य धंद्यावर कारवाईचा बडगा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळूंखे यांच्या मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे आगामी दहिहंडी व गणेश उत्सवाच्या अनुषंगाने उमदी पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे करणाऱ्या ४ लोकांवर कारवाई केली गेली आहे. कारवाईमध्ये एकूण ४ गुन्हे दाखल केले आहेत. सचिन भुताळदी बेरुनगी वय २९ रा. उमदी, विठाबाई सावळा करे वय ६० रा. तिकोंडी करेवाडी, आवाण्णा तिमय्या इळगेर वय ६० भिवर्गी, कलकाप्पा रामाण्णा इळगेर वय ५१ रा. भिवर्गी अशी कारवाई करण्यात आलेल्या अवैद्य धंदेवाल्यांची नावे आहेत. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप शिंदे यांनी हद्दीतील अवैद्य धंदेवाल्यांची गय केली जाणार नसून कारवाई अजून तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगितले.