दुखापत व शिवीगाळ केल्याप्रकरणी आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर.

0
2

सोलापूर : कुंभारी नाका सोलापूर येथे दिनांक ३१ रोजी रात्री नऊच्या सुमारास दुर्गा कॅन्टीन जुना कुंभारी नाका सोलापूर या ठिकाणी प्रकरणातील फिर्यादी नामे राकेश कोरे यास तीन हजार रुपये देणे घेण्याचे कारणावरून आरोपी नामे संदीप चव्हाण ,श्रीकांत कोयलू व अज्ञात दोन व्यक्तींनी लोखंडी रोड व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती. तरी वरील आरोपीं विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे दिनांक ०२/०६/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मे. जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे आरोपी नामे गणेश गडपल्ली व रामदास दिकोंडा अटकपूर्व जामीन दाखल केला होता. तो अटकपूर्व जामीन अर्ज मेहरबान जिल्हा व सत्र न्यायालय मंजूर केला आहे. वरील प्रकरणात आरोपी कडून ऍड. कदीर औटी, ऍड. एच एच बडे खान, ऍड. इक्बाल शेख, ऍड. तनवीर इंडीवाले व ऍड. दत्तात्रेय कापुरे यांनी काम पाहिले.