गोंदिया, दि.15 : फिर्यादी रुपसिंग कमलसिंग कुंजाम यांनी रेल्वे पोलीस स्टेशन गोंदिया येथे माहिती दिली की, त्यांचा भाऊ सुरपतसिंग कमलसिंग कुंजाम, वय 45 वर्ष, राहणार वार्ड नं.10 अमोली, ठाणा लामता, ता.जि.बालाघाट (मध्यप्रदेश) हा 4 सप्टेंबर 2023 रोजी त्यांचे गावचे दिपेश पंधरे, सुंदरलाल पंधरे, मोहपाल मरस्कोल्हे, मुलचंद मरस्कोल्हे, रामवतीबाई मरस्कोल्हे यांचेसह मजुरीच्या कामासाठी अमोली गावातून रेल्वे स्टेशन लामठा येवून तिथून रेल्वे स्टेशन गोंदिया येथे 4 सप्टेंबर 2023 रोजी 15.30 वाजता आले व नागपूर येथे जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसण्यासाठी प्लॅटफार्म क्र.3 वर येऊन सुपरफास्ट ट्रेनमध्ये मागील जनरल कोचमध्ये त्यांचे इतर साथीदार हे नमुद ट्रेनमध्ये चढले परंतु हरविलेला इसम हा गर्दी असल्याने ट्रेनमध्ये बसू शकला नाही. सदर ट्रेन नागपूर करीता रवाना झाली परंतु आजपावेतो यातील हरविलेला व्यक्ती हा कामाचे ठिकाणी किंवा त्यांचे घरी न पोहचल्याने यातील फिर्यादी यांनी आपले इतर नातेवाईकांकडे विचारपूस केली असता कोणतीच माहिती मिळू शकली नाही. त्यावरुन नमुद फिर्यादी हे गोंदिया रेल्वे पोलीस स्टेशनला हजर होऊन त्यांचे भाऊ सुरपतसिंग कमलसिंग कुंजाम, वय 45 वर्ष हे हरविलेबाबत लेखी फिर्याद दिल्याने प्रभारी अधिकारी यांचे आदेशाने मनुष्य मिसिंग क्र.06/2023 अन्वये दाखल करण्यात आले.
हरविलेल्या इसमाचे वर्णन : वय- 45 वर्ष, रंग- सावळा, उंची- 167 सें.मी., बांधा- साधारण मध्यम, चेहरा- लांब, उजव्या डोळ्याचे बाजुला जुने माराचे निशान, मिशी- काळी बारीक, नेसणीस- फिक्कट गुलाबी रंगाचा फुलशर्ट व गळ्यात लाल कलरचा गमछा, सिमेंट कलरचा फुलपॅन्ट, केस- काळे लहान व साधारण आहे.
अशाप्रकारचे वर्णन असलेला व्यक्ती जर कोणाला आढळून आल्यास रेल्वे पोलीस स्टेशन, गोंदिया येथे कळविण्यात यावे. असे रेल्वे पोलीस स्टेशन गोंदिया येथील तपासी अंमलदार चंद्रकांत भोयर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.