पांगोली नदीला पूर,गोंदिया-आमगाव मार्गाची वाहतूक वळविली

0
25

गोंदिया-शुक्रवारी मध्यरात्री आणि पहाटे पासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाऊसाचे पाणी साचलेले होते. गोंदिया शहरातून वाहणारी पांगोली नदी दुथडी भरुन वाहत असल्यामुळे गोंदिया आमगाव मार्ग बंद करण्यात आले आहे. नदीवरील पाणी ओसरल्यानंतर मार्ग पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे सहायक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी बोलताना सांगितले.

पांगोली नदीचा डायव्हर्शन रस्ता गोंदिया आमगाव मार्ग नदीची पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे सर्व वाहनांसाठी (टू व्हीलर, फोर व्हीलर, हेवी व्हीकल्स करिता) तात्पुरता बंद करण्यात आला आहे.तसेच या मार्गावरील वाहतुक रावणवाडी कामठा मार्ग तसेच गोरेगाव ठाणा मार्ग वळविण्यात आली आहे.