33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता भाजपा नेत्याच्या वाहनाला भरधाव एसटीची धडक

भाजपा नेत्याच्या वाहनाला भरधाव एसटीची धडक

0
24

blank

बुलढाणा : बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा भाजपा नेते विजयराज शिंदे यांच्या वाहनाला भरधाव एसटी बसने धडक दिली. यामुळे त्यांच्यासह सुमारे सहाजण जखमी झाले. एअर बॅग लगेच उघडल्याने अपघाताची तीव्रता कमी झाली. अकोला ते अमरावती दरम्यान आज दुपारी ही दुर्घटना घडली. जखमींवर अकोला येथे उपचार सुरू आहे.या घटनेचा विस्तृत तपशील कळू शकला नाही. मात्र प्राप्त माहितीनुसार, शिंदे यांनी अकोल्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर खासदार अनिल बोंडे यांच्या भेटीसाठी अमरावतीकडे निघाले.अकोला सीमेवर कारंजा येथून अकोल्याकडे जाणाऱ्या एसटी बसने त्यांच्या वाहनाला धडक दिली.

blank