जि.प अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्याकडून जि.प. शाळा बोटे ची पाहणी

0
10

गोंदिया जि.प अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी बोटे येथे जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन शाळेची पाहणी केली व आवश्यक सूचना शाळा प्रशासनाला दिल्या. गरज असल्यास निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सामान्य वर्गातील मुले शिक्षण घेत असतात. शाळांमध्ये मुलभुत सुविधा तसेच अभ्यासाकरीता अडचणी निर्माण होऊ नये व सहजतेने सर्व सोय सुविधा उपलब्ध असाव्यात असे मत यावेळी पंकज रहांगडाले यांनी व्यक्त केले. दरम्यान पंकज रहांगडाले यांनी  विध्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना खाऊ दिला. यावेळी जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले, प.स. सदस्य किशोर पारधी शाळेचे अध्यक्ष बोपचेजी, मुख्याध्यापक शहारे सर, एम सी बिजेवार, कु.पी.के बघेले तसेच कर्मचारी व विद्यार्थीगण उपस्थित होते.