देवीच्या दर्शनावरुन परततांना अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण अभियंता ठार

0
6

गडचिरोली : चंद्रपूर येथील महाकालीचे दर्शन घेऊन दुचाकीने परत गावाकडे निघालेल्या पती – पत्नीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अभियंता असलेल्या पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी झाली. १९ ऑक्टोबरला रात्री आष्टी-चंद्रपूर मार्गावर हा अपघात घडला. प्रमोद देवराव जयपूरकर (२७,रा.आष्टी ता.चामोर्शी) असे मृताचे नाव असून पत्नी प्रणाली प्रमोद जयपूरकर (२३) जखमी आहेत.

प्रमोद हे गडचिरोलीत प्रधानमंत्री ग्रामसडक योजना विभागात स्थापत्य अभियंता  होते. पत्नी प्रणालीसमवेत ते महाकाली देवीच्या दर्शनाला दुचाकीने (एमएच ३३ यू- ३६०८) गेले होते. दर्शन घेतल्यावर परतताना उशीर झाला. रात्री साडेनऊ वाजता चंद्रपूरच्या सावलीजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यानंतर वाहन सुसाट निघून गेले. यात प्रमोद जयपूरकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्त्राव होऊन जागीच ठार झाले.