यशवंत लंजे यांचे निधन

0
4

अर्जुनी मोर. :– तालुक्यातील बोंडगाव देवी येथील युनायटेड एज्युकेशन सोसायटी बोंडगाव देवी चे सचीव तथा सेवानिवृत्त उपविभागीय वन अधिकारी यशवंत नत्थुजी लंजे यांचे आज ता. 20 ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजता दिर्घ आजार व वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी ते 75 वर्षांचे होते. त्यांचेपश्च्यात पत्नी, एक मुलगा, तिन मुली, नातवंड व बराच मोठा परिवार आहे. लक्ष्मी सहकारी भात गिरणीचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राकेश लंजे यांचे ते वडील होत.बोंडगाव देवी मोक्षधामात आज ता 20 ऑक्टोबर ला दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.