नादुरूस्त बस घेऊन जाणाऱ्या एसटीला मालवाहूची धडक; चालक ठार

0
4

बुलढाणा: खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा परिसरात घडलेल्या विचित्र अपघातात एक चालक ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. राहुड फाट्याजवळ आज शुक्रवारी (दि २७) ही दुर्घटना घडली.

एसटी महामंडळाच्या खामगाव आगाराची बस (एमएच ६ एस ८२५६) प्रवासादरम्यान बिघडली. आगाराची दुसरी बस (एमएच ४० क्यू ६१३०) टोचन करून या बसला खामगाव कडे येत होती. दरम्यान समोरून येणाऱ्या (एम एच ०४ /८८५५ क्रमांकाच्या) मालवाहू वाहनाने बसला भरवेगात धडक दिली. यामुळे ट्रकचालक नईम शहा कयूम शहा (रा. राजूर, ता मोताळा जिल्हा बुलढाणा)हा जागीच दगावला. बसचालक अरविंद दामोदर (जळका भडंग ता खामगाव) हा गंभीर जखमी झाला.