धम्मभूमी काळीमाती येथे कठीण चिवर दान महोत्सव ५ नोव्हेंबरला

0
3

अर्जुनी मोर. :–( सुरेंद्रकुमार ठवरे ) तालुक्यातील धम्मभूमी काळीमाती ता. अर्जुनी मोर. येथे चार नोव्हेंबर रोजी भिक्षु संघाच्या उपस्थितीमध्ये महापरीत्रण पाठ आणि कठीण चिवर शिवणे व पाच नोव्हेंबर रोजी कठीण चिवर दान व संघदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
बुद्ध शासनामध्ये आर्य सत्पुरुषांच्या संगतीने आर्य धम्माने परिचित व आर्य विनयाने विनीत कुशल कर्म करून पुण्यसंपादन केले जाते. बुध्द शासनामध्ये कठीण चिवरदान करणे व त्यामध्ये सहभाग घेणे महान कुशल कर्म समजले जाते. स्मृतीशेष भदंत प्रज्ञा ज्योती थेरो व भदंत धम्म ज्योती यांचे पावन पदस्पर्शाने पुनीत झालेल्या धम्मभूमी कालीमाती तालुका अर्जुनी मोरगाव येथे वीस वर्षांपूर्वी अनंत पौर्णिमेपासून वर्षावास कार्यक्रमाची सुरुवात केली .तेव्हापासून गुरुपौर्णिमेपासून ऑक्टोबरच्या शेवटच्या पौर्णिमेपर्यंत हिरवेगार वनराईने नटलेल्या मंगलमय व शांत वातावरणात वर्षावास कार्यक्रम अविरत सुरू आहे. यावर्षी 28 व 29 सप्टेंबर रोजी अनंत पौर्णिमेच्या पावन पर्वावर दोन दिवस हजारो उपासक उपासिकेच्या उपस्थितीत रात्रंदिवस धम्मदेशना व महापरित्रण पाठाचा कार्यक्रम संपन्न झाला. महाप्रज्ञा धम्मकानंन व अनागारीक कल्याणकारी संस्था कालीमाती व परिसरातील श्रद्धा संपन्न उपासक उपसिका या कार्यक्रमाचे आयोजन करते. यावर्षी भदंत आनंद स्थवीर व भंते बोधिपालो खंन्ती व बालश्रामणेर सागर यांनी सतत तीन महिन्याच्या वर धम्मभूमी कालीमाती येते मुक्कामी राहून वर्षावास केला. परिसरातील बौद्ध उपासकांनी दररोज भंतीजींच्या भोजनाची व्यवस्था सुद्धा केली होती. चार ते पाच नोव्हेंबर 2023 ला होणाऱ्या कठीण चिवरदान महोत्सवाला भदंत डाॅ. धम्मसेवक महास्थवीर, भंते नंद, भंते रतनसार, भंते धम्मपाल ,भंते सुमोदो नागरत्न ,भन्ते सोन, भंते गौतमपाल व श्रामणेर जीवकबोधी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. चार व पाच नोव्हेंबरला होणाऱ्या कठीण चिवरदान महोत्सवाला परिसरातील बौद्ध उपासक उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केली आहे.