जिल्ह्यात पाच जणांनी केले विषप्राशन एकाचा मृत्यू

0
10

गोंदिया : सालेकसा, सडक-अर्जुनी व गोंदिया या तीन तालुक्यातील पाच जणांनी विषप्राशन केल्याने यापैकी एकाचा मृत्यू तर चौघे गंभीर असून त्यांना उपचारासाठीन गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

सालेकसा तालुक्याच्या आमगावखुर्द येथील काशिनाथ सोमाजी बागडे (५८) याने २८ ऑक्टोबर रोजी विषप्राशन केल्याने त्याला गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार घेतांना ३ नोव्हेंबर रोजी पहाटे २ वाजता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे.

सडक-अर्जुनी तालुक्याच्या कोकना येथील मुनेश्वर रामजी कापगते (४२) याने १ नोव्हेंबर रोजी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. गोंदिया तालुक्याच्या आंभोरा येथील शुभम जनक गुजर (२५) यांनेही १ नोव्हेंबर रोजी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सालेकसा तालुक्याच्या बोदलबोडी येथील धर्मेंद्र भरतलाल बहेकार (३०) यानेही विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने त्याला ३ नोव्हेंबर रोजी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

गोंदिया तालुक्याच्या झिलमिली येथील संजू संजय मरस्कोल्हे (२०) रा. झिलमिली यानेही ३ नोव्हेंबर रोजी विषप्राशन केल्याने त्याचा गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार केल्यानंतर त्याची गंभीर परिस्थिती पाहून पुढील उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.