मोबाईल चोरीच्या गुन्हयातील आरोपीना बांग्लादेशात पळुन जातांना झारंखंडमध्ये अटक

0
7

गोंदिया,दि.15ः- जिल्ह्यातील आमगाव पोलीस ठाणेंतर्गत 02 आँक्टोंबर 2023 रोजीच्या मध्यरात्री सुमारास आमगांव येथील पवार ऐजन्सीज मोबाईल विक्रीचे बंद दुकानाचे पाठीमागील भिंतीला भगदाड पाडुन आत प्रवेश करुन दुकानातील विविध कंपनीचे महागडे मोबाईल फोन व मोबाईल एक्सेसरीज असा एकूण किंमती 5 लाख 59 हजार 412/- रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यानी लंपास केला होता.फिर्यादी दुुकानदाराच्या तक्रारीवरुन पोलीस ठाणे आमगाव येथे अपराध क्र.331/2023 कलम 454, 457, 380, भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.त्या गुन्ह्यातील आरोपींना तपास पथकाने बांग्लादेशात पळून जाण्याच्या तयारीत असतांना झारखंड राज्यातील साहेबगंज जिल्ह्यातील पियारपूर या गावातून दोघांना ताब्यात घेतले आहे.

आमगांव पोलीस ठाणेचे तपासी अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे आणि पोलीस पथक हे आरोपी शोध व तपास संबंधाने झारखंड येथे गेले असता दिनांक 09 जानेवारी 2024 रोजी चे रात्री 23:00 पथकाला गुप्त बातमीदार कडून माहिती मिळाली की नमूद गुन्हयातील पाहिजे आरोपी हे राधानगर पोलीस ठाणे जिल्हा साहेबगंज राज्य झारखंड हददीतील पियारपुर गावामध्ये असून ते बांग्लादेशामध्ये पळून जाण्याचा तयारीत आहेत.अश्या प्राप्त माहिती वरुन आमगाव पोलीस पथकाने मानवी कौशल्य व तांत्रिक विश्लेषणाचा वापर करुन दिनांक 10 /01/ 2024 रोजी चे रात्री 03.00 वाजेच्या सुमारास स्थानिक पोलीसांच्या मदतीने आरोपीतांचे राहते घरावर छापा टाकुन गुन्ह्यांत पाहिजे आरोपी नामे  लुटू जमीदार शेख,वय 30 वर्ष.रा.अजमतटोला, प्राणपुर (पियारपुर) पोलीस ठाणे- राधानगर, जिल्हा साहेबगंज (झारखंड), असरुद्दीन मुस्ताक शेख वय 40 वर्ष रा. मध्य -पियारपुर भुनतीटोला, पोलीस ठाणे- राधानगर, जिल्हा साहेबगंज, (झारखंड) यांना ताब्यात घेतले. नमूद दोन्ही आरोपी यांना गुन्ह्याचे अनुषंगाने, गुन्हयातील चोरीस गेलेल्या मुद्देमाल बाबत विचारणा केली असता मोबाईल फोन चोरी केल्याचे कबूल केले.त्याचे ताब्यातून चोरलेल्या मोबाईल पैकी दोन मोबाईल फोन हस्तगत करून जप्त करण्यात आलेले आहेत.गुन्ह्याचे अनुषंगाने अधिकचा सखोल तपास सुरू आहे..

सदरची उल्लेखनिय कामगिरी निखील पिंगळे पोलीस अधिक्षक गोदिया,नित्यानंद झा अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया,  संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग, आमगांव यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक युवराज हांडे, पो. ठाणे आमगांव यांचे मार्गदर्शनात सहा.पो. नि. गणपत धायगुडे, पो. हवा. लिखीराम दसरे, पो.शि. अशोक साबळे, भाऊराव कठाणे यांनी कामगिरी बजावली आहे.