राष्ट्रीय युवा दिवस उत्साहात संपन्न

0
3

भंडारा,दि.15 :युवा कार्यक्रम तथा खेळ मंत्रालय भारत सरकार च्या नेहरु युवा केंद्र,द्वारा 12 जानेवारी,2024 रोजी आठवले समाजकार्य महाविद्यालय भंडारा येथे राष्ट्रीय युवा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष,व उद्घाटक व प्रमुख अतिथी यांच्या शुभ हस्ते युवकांचे प्रेरणा स्थान स्वामी विवेकानंद व स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीप प्रज्वलन केले.

         तसेच शुमंगल वातावरणात व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे स्वागत करुन गीत व पुष्प गुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेहरू युवा केंद्र,कार्यक्रम सहाय्यक रमेश अहिरकर यांनी केले.तसेच कार्यक्रमाला उद्घाटक सहायक मोटर वाहन निरीक्षक सूरज पवार यांनी युवा दिन व रास्ता सुरक्षा अभियान या विषयावर मार्गदर्शन केले.

          या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संचालक,दिव्येश करिअर अकॅडमी,प्रा.अनिल महल्ले यांनी स्वामी विवेकानंद जीवनचरित्र विषयवर मार्गदर्शन केले.अतिथी प्रमुख घनश्याम पवार,सहाय्यक मोटर वाहरन निरीक्षक सचिन भोजने तर आठवले समाजकार्य महाविद्यालयातील प्रा.डॉ.ज्योती नाकतोडे,नंदकिशोर भगत तथा महाविद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन प्रा.आम्रपाली भिवगडे यांनी केले.तर आभार प्रा.चंदु पाटील यांनी केले.