धावत्या गाडीत चिमुकलीशी अश्लील चाळे, कोच अटेंडेंटला प्रवाशांनी चोपले

0
8

नागपूर : पाटलीपुत्र एक्स्प्रेसच्या वातानुकूलित (एसी) डब्यामध्ये कोच अटेंडेंटने नऊ वर्षांच्या बालीकेशी शौचालयात अश्लील चाळे केल्याने संतप्त प्रवाशांनी अटेंडेंटला चांगलाच चोप दिला. ही घटना मंगळवारी बुटीबोरी रेल्वे स्थानकाच्या आसपास घडली. लोहमार्ग पोलिसांनी आरोपी मोहम्मद मन्नू (३०) रा. चाकण, गया यास अटक केली आहे.

मुन्नू रेल्वेत नऊ वर्षांपासून एका खासगीमार्फत कोच अटेंडेंट आहे. एसी बोगीतील प्रवाशांना चादर, ब्लॅकेट देणे, ते गोळा करण्याचे त्याचे काम आहे. एक चिमुकली तिची आई, आजी आणि भाऊ यांच्यासोबत एसी बोगीतून प्रवास करीत होती. हे कुटुंब पाटण्याला जात होते. बुटीबोरीजवळ असताना चिमुकली लघुशंका करायला शौचालयात गेली. बराचवेळ लक्ष ठेवून असलेला मुन्नूदेखील तिच्यापाठोपाठ शौचालयात शिरला आणि आतून कडी लावली. ती घाबरली, त्याने चिमुकलीशी अश्लील चाळे केले. दार उघडताच ती रडत रडत आईकडे गेली आणि झालेला प्रकार सांगितला.आई आणि आजीने बोगीतील प्रवाशांना या प्रकाराची माहिती दिली. संतापलेल्या प्रवाशांनी आरोपीला पकडून मारहाण केली. तसेच या घटनेची माहिती रेल्वे नियंत्रण कक्षाला दिली. लोहमार्ग पोलिसांचे पथक क्रमांक एकच्या फलाटावर आले. पीडित आरोपीला ताब्यात घेण्यात आले.