रस्ता दुभाजकाला धडकून कार उलटली, शिक्षक दाम्पत्य सुखरूप बचावले

0
12

गडचिरोली : ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एका शिक्षक दाम्पत्याची भरधाव कार रस्ता दुभाजकावर धडकली आणि उलटली. कारची चारही चाके वर झाली. काचाही फुटल्या, अपघातानंतर परिसरातील लोक धावून आले. कारमधील शिक्षक दाम्पत्याला बाहेर काढले. पण त्यांना साधे खरचटलेही नव्हते, त्यामुळे सर्वांचा जीव भांड्यात पडला. या अपघाताने ते दाम्पत्य मात्र चांगलेच हादरून गेले होते.

युवराज लंजे आणि शालू लंजे अशी त्या अपघातग्रस्त कारमधील शिक्षक दाम्पत्याची नावे आहेत. सुभाषग्राम येथील इंदिरा गांधी मेमोरियल हायस्कूलमध्ये ते शिक्षक आहेत. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातल्या बोदडे (करळगाव) या मूळ गावावरून ते आष्टीकडे जात होते. मात्र गुरूवारी संध्याकाळी आरमोरी मार्गावरील सुमानंद सभागृहाजवळ त्यांच्या कारला अपघात झाला.अपघाताची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी बघ्यांची चांगलीच गर्दी जमली होती.