शेतसंध्या कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी व पत्रकारांचा सत्कार

0
8

अर्जुनी मोर.-) एस. के. ग्रुप सावरटोला नवेगाव बांधचे युवा सामाजिक कार्यकर्ते इंजि. सुनीलभाऊ तरोणे व माजी जि. प. सदस्य किशोर भाऊ तरोणे यांचे सुपीक कल्पनेतून सावरटोला शेत शिवारात तारीख 17 जानेवारीला शेतसंध्या ( संजोरी) व शेतावरील हुरडा पार्टी तथा संगीतमय हास्यकल्लोळ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी तालुक्यातील प्रगतशील शेतकरी तथा पत्रकार यांचा सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला.
या अभिनव कार्यक्रमाला काँग्रेसचे गोंदिया जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव गंगाधर परशुरामकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यशवंत गणवीर, गोंदिया जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, गोंदिया जिल्हा परिषद चे गटनेते लायकराम भेंडारकर, प्रमोद लांजेवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे ,माजी सरपंच हेमकृष्ण संग्रामे, पं. स. उपसभापती होमराज पुस्तोडे, पं. स. सदस्य डॉ. नाजूक कुंभरे, खरेदी-विक्रीचे संचालक चामेश्वर गाहाणे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. गजानन डोंगरवार, नगरसेवक दाणेश साखरे, आयोजक इंजी. सुनील तरोणे, किशोर तरोणे, प्रमोद पाऊलझगडे तथा विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षापासून समाजाचे काही देणे आहेत म्हणून सावरटोला/बोरटोला येथील सुनील व किशोर तरोणे बंधू गावात विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये दरवर्षी गावातील नवीन जावयांचा सत्कार ,गावातील गुराख्यांचा सत्कार दिवाळीच्या मुहूर्तावर राबवीत असतात, तर गेल्या अनेक वर्षापासून सावरटोला शेत शिवारात शेतसंध्या( संजोरी )हा कार्यक्रम हमखास घेत असतात. यावर्षी १७ जानेवारीला तरोणे बंधूंनी सावरटोला शेतशिवारात शेतसंध्या संजोरी व एजाज भाई प्रस्तुत संगीतमय हास्यकल्लोळ व लावणीचा बाहारदार कार्यक्रम ठेवण्यात आला. या कार्यक्रमाला आलेल्या सर्व पाहुणे मंडळींना विविध प्रकारच्या कडधान्याचा गरमागरम हुरडा खाऊ घालण्यात आला. त्यानंतर विविध पंच पक्वानांची मेजवानी देण्यात आली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून एस के ग्रुप च्या वतीने तरोणे बंधूंनी तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा व पत्रकारांचा शाल श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन सत्कार केला. व लगेचच एजाज भाई प्रस्तुत मराठमोळी लावणी व हास्यकल्लोड कार्यक्रमाची मेजवानी प्रस्तुत करण्यात आली. हा इतका बहारदार कार्यक्रम झाला की उपस्थित मान्यवरांचे सुद्धा पाय थिरकायला लागले तर जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर ,उपसभापती होमराज पुस्तोडे यांनी नाट्यसंगीत गायले तर पंचायत समिती सदस्य नाजूक कुंभरे यांनी रफी साहेबांचे दर्द भरा गीत गाऊन तर वैद्य नामक वयोवृद्धाने शेरोवाली मा हे गीत गाऊ उपस्थितांना मंत्रमुग्ध केले तर कॅमेडी किंग एजाज भाई यांची गाणी व हास्यकल्होळ कार्यक्रमाने उपस्थितांचे पाय थिरकले तर हास्यांचे फवारे सुद्धा उडले. यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांनी या संजोरी कार्यक्रमाबद्दल तरोणे बंधूचे मनापासून धन्यवाद मानले व उपस्थितांना मार्गदर्शनही केले. हा संजोरी कार्यक्रम ठेवण्यामागची भूमिका किशोर तरोणे यांनी प्रास्ताविकातून विशद केली. कार्यक्रमाचे संचालन लोकपाल गहाणे, सुनील तरोणे तर उपस्थितांचे आभार लक्ष्मीकांत खोटेले यांनी मानले. यशस्वीतेसाठी एस के ग्रुपच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.