न्यायाधिश वकिलात बाचाबाची,वकिलाला पाच दिवसाची शिक्षा,तुुरुंगात रवानगी

0
94

गोंदिया : एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायाधीश व खाजगी वकिल या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यामुळे संतापलेल्या न्यायाधिशांनी न्यायालय अवमानना प्रकरणी खाजगी वकिलाला ९० रुपये दंड तसेच दंड न भरल्यास १० दिवसाची शिक्षा सुनावली. ही घटना आज ५ फेब्रुवारीला गोंदिया जिल्हा न्यायालयात दुपारी १२ वाजता दरम्यानची आहे. अ‍ॅड. पराग तिवारी असे शिक्षा झालेल्या खाजगी वकिलाचे नाव आहे. उल्लेखनीय असे की, अ‍ॅड.तिवारी यांनी दंड भरण्यास चक्क नकार दिला. त्यामुळे तिवारी यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. प्रकरणाला घेवून गोंदिया जिल्हा बार असोसिएशनकडून न्यायालयाच्या शिक्षेला घेवून चांगला असंतोष व्यक्त केला जात आहे.
सविस्तर असे की, न्यायामूर्ती कुलकर्णी यांच्या न्यायालयात एका प्रकरणाला घेवून सुनावणी ठेवण्यात आली होती. दरम्यान पक्षकाराचे वकिल पगार तिवारी हे थोडे न्यायालयात उशिरा पोहचले. यावरून न्यायमूर्ती कुलकर्णी यांनी थेट पक्षकारालाच वकिल बदलविण्याचा सल्ला दिला. यामुळे अ‍ॅड. पराग तिवारी यांनी आक्षेप घेतला दरम्यान न्यायामूर्ती कुलकर्णी व अ‍ॅड. तिवारी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या प्ररणात कसलाही वेळ न गमवता, न्यायामूर्ती कुलकर्णी यांनी न्यायालयीन अवमानना प्रकरणी अ‍ॅड. तिवारी यांना ९० रुपयाचा दंड किंवा दंड न भरल्यास १० दिवसाची शिक्षा सुनावली. मात्र अ‍ॅड. तिवारी यांनी दंड न भरण्याचा अट्टाहास धरून शिक्षेला स्विकार केला. यामुळे गोंदिया पोलिसांनी अ‍ॅड. तिवारी यांना ताब्यात घेवून कारागृहात रवानगी केली. उल्लेखनीय असे, गोंदिया जिल्ह्यात पहिल्यांदाच वकिलाला शिक्षा सुनावल्याची घटना नोंद झाली आहे.