98,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत……गुन्हा नोंद
गोंदिया,दि.22- गोंदिया तालुक्यातील रावणवाडी पोलिसांनी आरटीओ. चेक पोस्ट, रावणवाडी येथील नाक्यावर अवैधरित्या पिस्तुल सारखा कट्टा सोबत बाळगणाऱ्या तिघांना ताब्यात घेत देशी कट्यासह 98 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यसिमेवर तसेच जिल्हा सीमेवर पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला आहे. पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी आगामी काळात लोकसभा निवडणुक असल्याने गोंदिया जिल्हयातील कायदा, सुव्यवस्था, शांतता अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यावर तसेच अवैधरित्या शस्त्रे, बाळगणारे गुन्हेगारावर आळा घालण्याकरीता कारवाई करण्याचे निर्देश सर्व ठाणे प्रभारी यांना दिले आहेत.त्या अनुषंगाने दिनांक 21/03/2024 रोजी रात्री दरम्यान पोलीस ठाणे रावणवाडीचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर पोलीस स्टाफ स.पो.नि. सुनिल अंबुरे व पो.हवा. संजय चौहान असे पोलीस स्टेशन रावणवाडी हद्दीत पेट्रोलिंग करित असतांना तीन इसम मोटार सायकल क्रमांक एम.पी.50/ एम.टी. 7198 वर ट्रिपल सीट बसुन बालाघाट कडुन गोंदियाकडे जाणार असुन त्यांचेकडे पिस्तुल सारखा दिसणारा गावठी कट्टा विक्री करण्याकरिता गोंदियाला जाणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांनी गोंदिया बालाघाट मार्गावरील आरटीओ बॅरेल चेक पोस्ट जवळ सापळा रचुन नाकाबंदी केली.दरम्यान मोटार सायकल क्रमांक एम.पी. 50 / एम.टी. 7198 येत असताना दिसून आल्याने तिन्ही संशयितांना थांबवुन विचारणा केली असता संशयित ईसंम नामे विशाल मुलायचंदसिंह लिल्हारे वय 23,रा.बगदरा ता. जि. बालाघाट (म.प्र.) व त्याचे सोबत असलेले दोन विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेण्यात आले.त्यांचेकडे असलेल्या सामानाची पाहणी करून झडती घेतली असता एक पिस्तुल सारखा दिसणारा गावठी कट्टा कि. सु. 50,000/- रु.,काळ्या रंगाची हिरो होंडा शाईन मोटार सायकल क्रमांक एम.पी. 50/ एम.टी. 7198 कि. सु. 30,000/-रु.निळ्या रंगाचा रेडमी कंपनीचा मोबाईल कि. सु. 3,000/ रु.,सिल्वर रंगाचा ओपो कंपनीचा मोबाईल फोन कि. सु.10,000/ रु.,निळया रंगाचा विवो कंपनीचा मोबाईल फोन कि. सु. 5,000/- रु. असा एकुण 98,000/ रु. चा मुद्देमाल मिळुन आल्याने हस्तगत करून जप्त करण्यात आले. उपरोक्त नमुद आरोपी व दोन विधीसंघर्षीत बालका विरुध्द पोलीस स्टेशन रावणवाडी येथे फिर्यादी पो. हवा. संजय रमेश चौहान यांचे रिपोर्ट वरुन अपराध क्रमांक 104/ 2024 कलम 3, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक सुनिल अंबुले पुढील तपास करित आहेत.