लोधी समाजाला संविधानिक अधिकार नाही मिळाले:- इंजि राजीव ठकरेले

0
8

अमर बलिदानी वीरांगना रानी अवंतीबाई लोधी यांचा बलिदान दिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

गोंदिया,दि.22- सन 1857 च्या उठावाच्या पहिल्या महिला स्वतंत्रता सेनानी व लोधी समाजाचे प्रेरणा स्रोत तसेच नारीशक्तीच्या सन्मानासाठी झटणारी अवंतीबाई लोधी यांच्या 166 व्या बलिदान दिवसानिमित्त लोधी समाजातर्फे शहरातील राणी अवंतीबाई लोधी चौकात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले.शहराप्रमाणेच तालुक्याच्या गावागावात ज्यात प्रामुख्याने कारंजा, पांढराबोडी, पार्डीबांध, जब्बरटोला, हिवरा, रतनारा, सहेसपुर, मुरदाडा, पांजरा, लोधीटोला (धापेवाडा), लोधीटोला (चुटिया), लोधीटोला (सावरी) महलगांव, तुमखेड़ा, चांदनीटोला, नागरा, मुरपार, रावणवाडी, कामठा, कटगटोला, मोहरान टोली, इर्री, चुलोद, दासगांव, ढाकनी, फुलचुर, बरबसपुरा, कटंगी, लोहारा, निलागोंदी इत्यादी गावात आणि अवंतीबाई यांच्या बलिदान दिनी श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी लोधी समाजाच्या संविधानिक अधिकारासाठी काय करता येईल यावरही चर्चा करण्यात आली. कारण लोधी समाजाला सन 2004 मध्ये काँग्रेसच्या सरकारनी महाराष्ट्र राज्यात राज्याच्या ओबीसीच्या सूचित समाविष्ट करून घेतले. परंतु केंद्राच्या मनमोहन सिंग च्या सरकारने दहा वर्ष लोधी समाजाला केंद्राच्या ओबीसीच्या सुचित समाविष्ट केले नाही. त्यानंतर मोदी सरकार आली त्यांनीही खूप आश्वासने दिले. पण त्यांचेही दहा वर्ष पूर्ण होऊन सुद्धा त्यांनीही लोधी समाजाला संविधानिक अधिकारापासून वंचितच ठेवले. ह्या वीस वर्षात लोधी समाजाच्या हजारो युवकांचे नुकसान झाले आणि त्यामुळे लोधी समाज हा मागे पडत गेला. लोधी समाजाच्या आर्थिक सामाजिक व राजनीतिक दृष्ट्याने समाज मागे झाला म्हणून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत लोधी समाज एकवट होऊन जे सरकार संविधानिक अधिकार देण्याचा पक्का वादा करेल त्यांनाच मतदान करेल अशी भूमिका ठरवण्यात आली आहे. अवघ्या दोन-तीन दिवसात लोधी समाज भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्याच्या जिल्ह्याची संयुक्त बैठक होणार असून त्यात निर्णय घेण्यात येईल.

बलिदान दिवसाच्या कार्यक्रमात वेगवेगळ्या गावात समाजाचे नेते व समाजसेवक उपस्थित होते त्यात प्रामुख्याने निरज उपवंशी(उपसभापति) , रूपचंद ठकरेले, रामेश्वर लिल्हारे, सुनील लिल्हारे, खेमलाल माहुले, नीरज नागपुरे, सुरेश लिल्हारे, संजू बाबा नागपुरे, नंदकिशोर बिरनवार, उमाप्रसाद उपवंशी, सूर्यकांत नागपुरे, अशोक नागपुरे, राजेंद्र नागपुरे,गुलशन अटरे निखिल चिखलोंडे, भुवन नागपुरे, उपेंद्र उपराडे, डिगेश नागपुरे, लक्ष्मण नागपुरे, इशु माहुले, आशाराम मस्करे, प्रविन धामडे, राज मस्करे,गंगा मस्करे, आशिर्वाद लिल्हारे, गोपाल माहुले, अंकुश वर्मा, प्रशांत लिल्हारे, अजय लिल्हारे, संतोष लिल्हारे गजानन नागपुरे, महेंद्र नागपुरे आदी उपस्थित होते.