विद्युत करंट लागुन बाप लेकाचा मृत्यू,मोरगाव शेतशिवारातील घटना

0
14
वाढदिवसाच्या शुभेच्छा

अर्जुनी मोर. ( सुरेंद्रकुमार ठवरे ) -शेतामधे जनावरांच्या बंदोबस्तासाठी लावलेल्या तारांच्या कुंपनाला विद्युत प्रवाह सुरु होता.अशातच विद्युत करंट लागल्याने बापलेकाचा मृत्यु झाल्याची घटना अर्जुनी मोर. तालुक्यातील मोरगाव शेतशिवारात २१ मार्च च्या रात्रौ १० वाजता घडली.यामधे वामण दुधराम हातझाडे वय ५० वर्षे, व मुलगा संतोष वामण हातझाडे वय २४ वर्ष रा.मोरगाव या दोन्ही बापलेकाचा दुर्दैवी मृत्यु झाला.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यामधील आरोपी ईश्वरदास मनोहर पर्वते वय ४७ रा.मोरगाव यांनी आपल्या मकापिकाच्या शेताभोवती लावलेल्या कुंपन तारामधुन विद्युत करंट सोडल्याने एखाद्या व्यक्तीच्या मृत्यु होण्याच्या संभव असण्याची जाणीव असताना आरोपी ने स्वतःचे राहते घरातुन विद्युत केबल टाकून कुंपनाचे तारेला विद्युत करंट लावला. त्यामुळे त्या तारेला चिपकल्याने सदर दोन्ही मृतक मरण पावले. आरोपीचे शेत मृतकाचे घराचे मागे असल्याने मृतक वामण दुधराम हातझाडे हा त्या शेताजवळुन रात्रौ १० वाजता जात असताना विद्युत प्रवाह सुरु असलेल्या तारांना स्पर्श झाल्याने जागेवरच मरण पावला. तर आपले वडील आले नाही म्हणुन मुलगा संतोष वामण हातझाडे वय २४ हा मागोमाग गेला वडील पडले असावे म्हणुन त्यांना उचलण्यासाठी गेला असता त्यालाही विद्युत करंट लागल्याने त्याचाही घटनास्थळीच मृत्यु झाला. हि घटना मृतकाचे मुलीच्या लक्षात आल्याने तिने सावधगीरी बाळगुन शेतमालकाला माहीती दिल्याने विद्युत प्रवाह बंद करण्यात आला.फिर्यादी दशरथ दुधराम हातझाडे यांचे तक्रारीवरुन अर्जुनी मोर. पोलीसांनी घटनास्थळाला भेट दिली. व पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर येथे पाठविले.शवविच्छेदनानंतर दोन्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अर्जुनी मोर. पोलीसांनी आरोपी ईश्वरदास मनोहर पर्वते यांचे वर अपराध क्रं.११२ भादंवि कलम ३०४ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांचे मार्गदर्नाखाली पोलिस उपनिरीक्षक किरण मेश्राम, बिट अंमलदार रोशन गोंडाणे, महेंद्र पुण्यप्रेड्डीवार करीत आहेत.