मुंडीकोटातील तरुण युवकांचा नदीत बुडून मृत्यू

0
11

तिरोडा- तालुक्यातील मुंडीकोटा गावातील काही तरुण युवक आज धुलीवंदनाच्या दिवसानिमिताने देव्हाडा बुजुर्ग जवळील वैनगंगा नदीवर पोहण्यासाठी चार ते पाच तरुण युवक मित्र गेले असता पाच मित्रापैकी एक तरुण युवक अमीत पुरुषोत्तम नागदेवे वय २८ वर्षे राहणार मुंडीकोटा यांचा पाय घसरुन वैंनगंगा नदीत बुडुन मृत्यू पावल्याची ह्दयदायक घटना  दुपारच्या दरम्यान घडली आहे.

स्थानिक मासेमारी करणाऱ्याच्या मदतीने मृतदेह शोध घेण्यात आला. तब्बल चार तासांनंतर मृतदेह शोधून काढण्यात स्थानीक मासेमारी करणाऱ्यांना यश आले सदर घटनेची नोंद करडी पोलिस स्टेशनला करण्यात आली असून पोलीसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी तुमसर येथील शासकीय रुग्णालयात पाठविलेआले. मुंडीकोटा गावातील तरुण युवकांचा नदीत बुडून मृत्यू पावल्याने गावात शोककळा पसरली आहे .तरुण युवकांच्या मृतदेहावर उद्याला दुपारच्या दरम्यान अंतिम संस्कार विधी करण्यात येणार आहे.