सिलेंडर स्फोट, एक ठार

0
8

घटनास्थळी आत्महत्या झाल्याचे उघड
वरूडच्या भवानी चाैक परिसरातील घटना
अमरावती,दि.2 : वरूड येथील शहरातील भवानी चाैक परिसरातील आज पहाटे चार वाजताचे सुमारास दाेन सिलेंडरचा स्फोट झाला. यात एक व्यक्ती ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला. दरम्यान याच इमारतीच्या वरच्या माळ्यावर स्फोटापुर्वी एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची बाब घटनेनंतर उघड झाली.
आज साेमवारी वरूड येथील भवान चाैकात श्याम चाैधरी यांच्या घरात आग लागल्याची घटना घडली. ही आग वरच्या माळ्यावर लागली हाेती. वरच्या माळ्यावर त्यांचे बहीण जावाई शंकर बुले राहत हाेते. ही बाब श्याम चाैधरी यांना कळविण्यात आली. काही वेळातच श्याम चाैधरी व त्यांचा मुलगा ऋषीकेश चाैधरी यांना वाचविण्यासाठी तेथे गेले. त्यांनी दार उघडताच सिलेंडरचा स्ाेट झाला. यात दाेघेही पिता-पुत्र गंभीर जखमी झाले. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान ऋषीकेश चाैधरी जखमी झाला. मात्र याच घटनादरम्यान श्याम चाैधरी यांचे बहीण जावाई आग लागलेल्या इमारतीच्या वरच्या माळ्यावरील एका खाेलीत आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळून आले. यामुळे शंकर पांडुरंग बुले (60) यांचा मृतदेह पाेलीसांनी आग विझल्यानंतर बाहेर काढला. या घटनेमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.