केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची 6 रोजी गोंदियात जाहीर सभा

0
6

– बालाघाट टी-पाईंट, मोदी ग्राऊंडवर होणार सभा

गोंदिया ः भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 6 एप्रिल रोजी गोंदिया जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. यादरम्यान ते भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ दुपारी 3.30 वाजता शहरातील बालाघाट टी-पाईंट मोदी ग्राऊंडवर आयोजित भव्य जाहीर सभेला मार्गदर्शन करणार आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांच्यासह खासदार, आमदार व महायुतीतील पदाधिकारी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. नागरिकांना जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महायुतीतर्फे करण्यात आले आहे.