जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या उपस्थितीत मतदार जनजागृती रॅलीचे उत्साहात आयोजन

0
5
वाशिम,दि.८  आज जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. , वाशिम उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, मालेगाव तहसीलदार दिपक पुंडे, , नगर पंचायत मुख्याधिकारी सुनील देशमुख, निवडणुक नायब तहसीलदार मालेगाव गजानन देशमुख, यांचे उपस्थितीत मतदान जनजागृती अभियान रॅली मालेगाव शहरामध्ये काढण्यात आली. मतदान जनजागृती अभियान रॅली ची सुरुवात नगरपरिषद कार्यालय मालेगाव पासून- तहसील कार्यालय समोरून – शेलु फाटा – पोलीस स्टेशन – समोरून अकोला फाटा व अकोला फाटावरून सरळ त्याच मार्गे परत व तहसील कार्यालय मालेगाव येथे रॅलीची सांगता झाली. रॅलीची सांगता झाल्यानंतर सर्व उपस्थित सर्वांना मा. जिल्हाधिकारी महोदया यांनी मतदान बाबत प्रतिज्ञा दिली. तसेच महिला मतदारांनी प्रामुख्याने या लोकशाही उत्सवात सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.