महामार्ग 275 वरील खामकुरा गावाजवळील घटना
अर्जुनी मोर
महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक 275 वडसा कोहमारा रस्त्यावरील खामकुरा गावाजवळ ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंपाउंड वॉल चे पोल साहित्य भरलेले ट्रक रस्त्याच्या कडेला उलटल्याने एक जण जागीच ठार तर तीन जखमी झाले. ही घटना दिनांक 10 एप्रिल रोजी सकाळी नऊ ते सव्वानऊ वाजेच्या दरम्यान घडली. सुरेश काशीराम शेंद्रे वय वर्ष 55 राहणार पठाणटोला तालुका सालेकसा जिल्हा गोंदिया असे मृतकाचे नाव असून जखमी मध्ये केवलचंद चैत्राम चौधरी व 26 वर्ष राहणार बामणी तालुका सालेकसा, जिल्हा गोंदिया रवींद्र भाऊलाल आत्राम वय 40 वर्ष राहणार पांढरवाडी तालुका सालेकसा जिल्हा गोंदिया बिश्नेश्वर छोटेलाल नागपुरे वय 26 वर्ष संदीप अशोक बागडे वय 28 वर्ष दोन्ही राहणार बामणी पठाणटोला तालुका सालेकसा जिल्हा गोंदिया ट्रक चालक वाहन चालक बाबूदास भाऊलाल नागपूरे वय 40 वर्ष राहणार सीतागोठा तालुका डोंगरगड जिल्हा राजनांदगाव अशी जखमींची नावे आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील आपल्यात आपल्या सह घटनास्थळी पोहोचून जखमींना ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर येथे दाखल केले.अपघात एवढा जबरदस्त होता की मृतक व जखमी हे शेताच्या बांधीमध्ये चिखलामध्ये ट्रक खाली दबल्या गेली होती. जेसीबीच्या साह्याने तसेच खामकुरा ग्रामवशियांनी अथक परिश्रम घेऊन मृतक व जखमींना बाहेर काढण्यात सहकार्य केले .पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी तागड पोलीस हवालदार डोंगरवार पुढील तपास करीत आहेत.