कोल्हापुरात एसटी बसने शिक्षिकेला चिरडलं;100 फूट नेलं फरफरटतघटना कॅमेऱ्यात कैद

0
23

कोल्हापूर :- दिवसेंदिवसे रस्त अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशीच एक धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात घडली आहे. हातकणंगले येथील संजय घोडावत विद्यापीठासमोर रस्ता क्रॉस करत असताना एसटी बसने धडक दिल्याने शिक्षिका जागीच ठार झालीय.

या अपघाताचा थरार सीसीटिव्हीत कैद झालाय. धडक दिल्यानंतर जवळपास 100 फूट एसटी बसने शिक्षिकेला फरफटत नेले. एका बाजुहून दुसऱ्या बाजूला ती रस्ता ओलांडत होती. यावेळी भरधाव आलेल्या बसची दुचाकीला जोरात धडक बसली. ही शिक्षिका एका खाजगी शिक्षण संस्थेत नोकरीला होती.

इचलकरंजीतही एक कामगार ठार

कोल्हापूर रोडवर एएससी कॉलेज चौकात एसटीच्या धडकेत सेंट्रिंग कामगार जागीच ठार झाला, तर आणखी एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. विनायक नीलकंठ मट्टीकल्ली (वय 40, रा. हनुमाननगर, इचलकरंजी) असे मृताचे नाव आहे. कृष्णात धोंडीबा रजपूत (वय 55, रा. जवाहरनगर) या गंभीर जखमीवर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघेही भरधाव वेगाने चौकाला वळसा घालून जात होते.

रुग्णवाहिका येण्यास विलंब होत असल्याने काही तरुणांनी दोघांना आयजीएम रुग्णालयात दाखल केले. कृष्णात यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातानंतर मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पुढे एक तास अन्य मार्गाने ती वळवण्यात आली. याप्रकरणी शंकर मट्टीकल्ली यांच्या फिर्यादीनुसार एसटी चालक सुनील गवळी यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.