तासगाव तालुक्यात SVEEP अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन

0
4

सांगली,दि.२१ – तासगाव तालुक्यामध्ये SVEEP अंतर्गत मतदान जनजागृती साठी भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.पोलीस विभाग,प्राथमिक शिक्षक, पंचायत समिती व PDVP कॉलेज असे चार तुल्यबळ संघ सदर स्पर्धेमध्ये उतरले होते.पहिल्या फेरीत प्राथमिक शिक्षकांच्या संघाने पोलीस विभागाच्या संघावर मात करत फायनलमध्ये प्रवेश केला,तर दुसऱ्या सामन्यामध्ये पंचायत समिती प्रशासन विभागाने PDVP कॉलेज संघाला नमवत फायनलची फेरी गाठली. दोन्ही सामने उत्कंठावर्धक व चुरशीचे झाले. फायनलच्या अटीतटीच्या सामन्यामध्ये कडवी झुंज देत पंचायत समिती संघाने लोकशाही चषकावर नाव कोरले. प्राथमिक शिक्षकांच्या संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.वैभव अंबी (विषय तज्ञ, समग्र शिक्षा अभियान, पंचायत समिती तासगाव) यांनी दोन्ही सामन्यात सामनावीर व तसेच मालिकावीर पुरस्कार पटकावला. सर्व सामने मैत्रीपूर्ण व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. सदर क्रिकेट स्पर्धांसाठी परिविक्षाधीन गट विकास अधिकारी अमित रंजन(भा.प्र.से.),रवींद्र रांजणे तहसिलदार तासगाव तसेच तालुक्यातील सर्व प्रशासकीय विभाग व सर्व प्राथमिक शिक्षक संघटना यांचे सहकार्य लाभले.स्वीप अंतर्गत राबवलेल्या या उपक्रमाबाबत सर्वांनी कौतुक व्यक्त केले.