मणिपूरमध्ये ११ केंद्रांवर उद्या २२ एप्रिल रोजी पुन्हा होणार मतदान

0
6

मतदानादरम्यान गोळीबार आणि हाणामारीची घडली होती घटना

इंफाळ:-देशामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी १९ एप्रिल रोजी २१ राज्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडल्या. यामध्ये मणिपूर राज्याचा समावेश होता. मणिपूरमध्ये मतदान प्रक्रियेदरम्यान अनेक ठिकाणी गोळीबार आणि हाणामारीच्या घटना घडल्या. यानंतर मणिपूरचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूर लोकसभा निवडणुकीदरम्यान ११ मतदान केंद्रांवर गोळीबार आणि हाणामारीची घटना घडली. याठिकाणी पुन्हा मतदान घेण्यात येणार आहे. या केंद्रांवर २२ एप्रिलला पुन्हा मतदान होणार आहे.

मणिपूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी गोळीबार आणि हाणामारी झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या. मणिपूरमध्ये मतदानाच्या दिवशी झालेल्या गोळीबारीच्या घटनेमध्ये एक नागरिक जखमी झाला होता. तर मणिपूरच्या इम्फाळमधील मोइरांगकंपू सेब अवांग लीकाई येथील मतदान केंद्रावर हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. आता याबाबत निवडणूक आयोगाने पुन्हा मतदान करण्याचे आदेश दिले आहेत. मणिपूरचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या आदेशानुसार आणि घोषणेनुसार या मतदान केंद्रांवर 22 एप्रिल रोजी पुन्हा मतदान होणार आहे.

मणिपूरचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार,’भारतीय निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 58(2) आणि 58A(2) अंतर्गत निर्देश दिले आहेत की, 11 मतदान केंद्रांवर 19 एप्रिल म्हणजेच शुक्रवारी मतदान झाले होते. आता या मतदान केंद्रावर 22 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पुन्हा मतदान प्रक्रिया होणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. मणिपूरमध्ये 19 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत 69.18 टक्के मतदान झाले होते.